जनता जागृत हो…
पाणी नाकापर्यंत पोहचणार अशी परिस्थिती आली हो,
तहान लागल्यास विहिर खोदनार,अशी अट असावी हो,
हक्क, अधिकार आपले सर्वस्व असे संविधान वाचवा हो,
जनता जागृत हो…
जनता जागृत हो ….
महागाई,दारिद्र्यता,गुलामी दारात वाजत आली हो,
कोरोनाच्या नावाने जनता उपाशी राहिली हो,
लोकशाहीच्या नावाने हुकुमशाही नावास आली हो,
जनता जागृत हो..
जनता जागृत हो ..
नोकरी,शेती,व्यापार घाईला येत आहे हो,
मी शरद उंडगे सांगतो,नाही राहिला विश्वास सरकार वर हो,
सर्व काही सरकारने विकायला काढले हो,
जनता जागृत हो..
जनता जागृत हो..
टीव्ही थोडा बंद करून ,आंदोलनास सहभाग द्या हो,
सर्व समस्येचे उत्तर,आंदोलना शिवाय पर्याय नाही हो,
आंदोलनाशिवाय पर्याय नाही हो,
जनता जागृत हो..
जनता जागृत हो…
- शरद गोविंद उंडगे
मुख्यसंपादक