आजरा- (अमित गुरव ) –
मडिलगे (ता आजरा ) येथील अनिता अवधूत येसणे (वय ३०) या विवाहितेचा माहेरून पन्नास हजार आणण्याकरीता तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अनिता हिने दिलेल्या फिर्यादीवरून नवरा अवधूत सदाशिव येसणे सासरा सदाशिव धोंडिबा येसणे व सासू सुनंदा येसणे ( रा. सर्व मडिलगे ) या तिघा विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की अनिता हिला दर वर्षी पन्नास हजार रुपये घेऊन येण्याकरता तिच्याकडे तगादा लावला होता. अन्यथा मी बोलणार नाही अशी सांगत फिर्यादिस शिवीगाळ करत असल्याची हकिकत सांगितली; तसेच सासू क्षुल्लक करणातून मला उपाशी पोटी ठेवे. अधिक तपास पोलिस नाईक करडे करत आहेत.

मुख्यसंपादक
अश्या नागरिकांच्या मुळेच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचें नाव खराब होत असतें बायकोच्या जिवावर जगणाऱ्या त्या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी आजरा पोलिसांनी जेणेकरुन पुन्हा असें करायची आपल्या आजरा तालुक्यामध्ये कोणाचीही हिंम्मत होणार नाहीं
त्या नराधमाला बहिण नाही .। आणि सासु सासर्याला मुलगी नाही म्हणून हा छळ चालत असे .यांच्या घरी स्व:ताची बहीण .। स्व:ताचीमुलगी नाही (१) ह्या च्या गळ्यात चपलांची माळ घाला गावातून वरात काढली पाहिजे (२)माझी पोलीस निरीक्षक यांना हात जोडून विनंती ह्या तिघांना कडीची शिक्षा मिळावी आणि मला विश्वास आहे पोलीस निरीक्षक त्या मुलीला न्याय मिळेल धन्यवाद आजरा पोलिस ठाणे