दसरा

जीवनातील संस्कृतीचे घ्यावे जाणूनी महत्व,
दसरा ,विजयादशमीचे शुभ मुहूर्ताचे महत्व.१

साडेतीन असती मुहूर्त महान हिंदू संस्कृतीचे ,
प्रतीक मांगल्याचे मुहूर्त दसरा विजयादशमीचे.२

विजय मिळविती श्रीराम करीती दहन रावणाचे,
शस्त्र काढिती पंडूनंदन जिंकण्या रण कुरूक्षेत्राचे.३

महिषासूरमर्दिनी दुर्गादेवीचे पूजन विजयादशमीचे,
विद्यादात्री सरस्वतीदेवीचे पूजन विजयादशमीचे.४

शमी वृक्षावर धनवर्षाव होई रघूराजाच्या पुंण्याईने,
पाने आपट्याची लुटती सोने समजूनी सिमोल्लंघनाने.५

शुभारंभ नवकार्याचा करीती मांगल्याच्या सणाने ,
अपुल्या संपूनी जाव्या व्यथा वेदना या नवचैतंन्याने .६

विजयादशमी दसरा सणाच्या सकळ रसिकांना मनःपूर्वक शुभेच्छा.

   कवी -श्री रेवाशंकर वाघ ठाणे
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular