सुंदरतेने नटलेला निसर्ग
रंगीबेरंगी दृश्य पाहून
उगवत्या मावळत्याचे
रूप पाहता मन मोहून ..
हिरवा शालू नेसुनी
वसुंधरा आज नटली
फुलांच्या बागेमध्ये
सखी मज भेटली ..
मंजुळ गाती गाणी
किलबिलणारे पाखरे
सु सु वारा देई साथ
अन खळखळणारे झरे ..
दृश्य पाहुनी हरखून गेलो
अन् सखी झाली बावरी
हिरवेगार सुंदर गालिचे
लोळण घेतो त्यावरी …
- किसन आटोळे सर
वाहिरा ता.आष्टी
मुख्यसंपादक