Homeमुक्त- व्यासपीठधेय्य स्थळावरचे ध्यान शिवराय

धेय्य स्थळावरचे ध्यान शिवराय

शिवराय होण्यासाठी हातात तलवार
घेऊन लढण्याची गरज नाही आता
कारण कित्येक क्षेत्र अशी आहेत की
कित्येकांना होता येते प्रत्येक क्षेत्रांत शिवराय.
वाटाही कित्येक आहेत,फक्त ठरवायचं
आपले लक्ष अण चालाय लागायचे
धेय्यस्थळ गाठोस्तर ध्येयाप्रती पूर्ण
इमानदारी ठेवून,
मग कुणीच मारणार नाही आपल्या पुढे बाजी.

एखादा ध्येय्यवेडा कलाकार
ही होऊ शकतो शिवराय,
समाजोन्नतीच्या उदात्त ध्येय्याने
प्रेरीत नेताही होऊ शकतो शिवराय,
स्वतःपूढे शिवराय होण्याचे स्वप्न
एखादा क्रिडापट्टूही ठेवू शकतो,
आपल्या शेतात प्रगत तंत्राने शिवशाहीच
धान पेरून शेतकरी ही शिवराय होवू शकतो.

ज्ञान विज्ञानाच्या दुनियेत उचला तलवारीसम लेखणी
शिवशाहीच्या तेजाने दिपून टाकू दिशा दाही,मराठी मूलखात दडलेल्या करू अंधकाराची कापणी.

शिवराय म्हणजे एखादा दैवीपूरूष नाहीत की त्यांचे ध्यान चिंतन मनन कराव.
शिवराय डोक्यावर घेण्याचा विषयच नाहीत
तर त्यांचे विचार डोक्यात सजले पाहीजेत.
जातधर्म,पंथ, पक्षात शिवराय मावणारच नाहीत कधी.
मनामनात यामातीच्या कणाकणात
शिवराय रुजले पाहिजेत.

शिवराय फक्त इतिहासाच्या
पानात अडकलेला एखादा राजाही नाही.
शिवराय म्हणजे मराठी माणसाचा नवा विचार अण प्रगतीच्या वाटचालीतील सर्वच्य ठिकाण.
आमची शान शिवराय, आमचा सन्मान शिवराय,
आमचे धेय्यस्थळावरचे ध्यान शिवराय.
पडते आहे एक एक पाऊल पुढच्या दिशेने
निर्मवयाचे आहे आम्हाला प्रत्येक क्षेत्रात
अजिंक्य शिवशाहीच ठाण
अजिंक्य शिवशाहीच ठाण

  • जगन्नाथ रावसाहेब काकडे . मेसखेडा (जालना )
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular