Homeवैशिष्ट्येनिरोप बाप्पाना

निरोप बाप्पाना

निरोप बाप्पा तुंम्हास देतो ,
पूढच्या वर्षी लवकर या.
सहवास तुमचा आठवतो,
पुढच्या वर्षी लवकर या .१

आराधना ही मनोभावाने ,
गणपतीबाप्पा करितो हो.
आशिर्वीद हा प्रसंन्नतेने ,
मंगलमूर्ती तुंम्ही द्यावा हो.२

दैनंदीन जीवनामधूनी ,
विघ्न ऊभी ठाकती हो .
निराकरण त्यांचे करूनी ,
सुख भक्तगणांसी द्यावे हो.३

कलीयुगातील भस्मासूर ,
ठायी ठायी दिसती हो.
मांगल्याचा देऊनी वर,
निर्दालन दृष्टांचे व्हावे हो.४

पूरे झाले देवा आता ,
व्यथा ,वेदना संपवा .
चरणावरी ठेवितो माथा,
कृपाप्रसाद आंंम्हा ओपावा.५

   कवी -  श्री रेवाशंकर वाघ ठाणे
   
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular