केली पाण्यासाठी धावपळं
त्याच्या शोधात गेलंय बळं
आली घशामधी जळजळं न्
कशी भरू मी सांगा चूळं
पाणी नासून आलीया वेळ न्
पाणी थेंब थेंब मिळं….
चल गं राणी, आणूया पाणी
खेळूया घागरी संगं…
उन्हाच्या पाऱ्यात,नसलेल्या वाऱ्यात
भिजू दे घामानं अंग…
माझ्या पोटात होते कळ….
पाणी थेंब थेंब मिळ….
बायकोची कटकट,नुसतीच वटवट
रोज रोज करतीय दंगा
तिला चूप म्हणतो,पाण्यास जातो
करू नको तू शिमगा
रागा रागानं आणतोय गाळं
पाणी थेंब थेंब मिळं
पाणी नाय तळ्यात,ते हाय डोळ्यात
परिस्थिती दुष्काळी…
निघून जावं कि मरून जावं,
खाऊन इकाची गोळी…
घाला अंघोळ म्हणतंय बाळं…
पाणी थेंब थेंब मिळं…
जमीन आपली,खडकाळ झाली
राहिलीच नाही माती…
तोडून झाडे,कत्तल केली
कुऱ्हाड घेऊन हाती…
कर्मानुसार मिळतंय फळं…
पाणी थेंब थेंब मिळं…
साहेब लुकडा,घेऊन मुखडा
कशास आलाय गावा…
असून ज्ञानी,मिळंना पाणी
गुपचूप शहरी जावा
आठ दिवासात लागंल खुळं
पाणी थेंब थेंब मिळं
✍️ विजय शिंदे…
३२शिराळा, सांगली.
महानायक कै दादा कोंडके यांच्या सिनेमातील” ढगाला लागली कळं” या गीताच्या गीतकारांची मनापासून माफी मागून मी केलेले विडंबन….

मुख्यसंपादक