Homeकृषी'पारिवारिक शेती’ दहा गूणधर्म

‘पारिवारिक शेती’ दहा गूणधर्म

‘पारिवारिक शेती’ दहा गूणधर्म -:
संयुक्त राष्ट्र संघाने ‘जागतिक पारिवारिक शेती’ वर्ष जाहिर केले असले तरी या संकल्पनेबाबत अद्याप संभ्रम आहे. हे नेमके काय आहे ? त्यात काय विशेष आहे ? उद्योगशिल शेती किंवा पारिवारिक शेती उद्योग’ या पेक्षा त्यात वेगळे काय आहे ? ज्या भागात आधुनिक शेती पद्धती अमलात आणली जात आहे तेथे जास्त मोठ्या प्रमाणात संभ्रम होण्याच्या शक्यता आहेत. ’जागतिक पारिवारिक शेती वर्षा’ च्या सुरुवातीलाच जॅने डोने यांनी त्यांच्या संकल्पना सोप्या करण्याचा प्रयत्न केला आहे आहे. वादातीत असणा-या ह्या शेतीपद्धतीच्या जवळ ते आपणास घेऊन जात आहेत.!
‘पारिवारिक शेती’ म्हणजे काय?
‘परीवारीक शेती’ ही संकल्पना तशी गुंतागुतीची आहे. समजायला फार सोपी नाही. पाश्चिमात्य समाजाला समजण्यासाठी तर ती कठीणच आहे. नोकरशाही विचार प्रणाली, तर्कशास्त्र चाकोरीबद्धपणा आणि औदयोगिक चौकटीतील दृष्टीकोण ह्याला आव्हान देणारी, त्याच्या पलीकडे जाऊन एक शेती संस्कृती , किंवा कृषीप्रणाली असे पारिवारिक शेती’ ला संबोधता येईल. कधी दिशाभूल करणारी, भूरळ पाडणारी शेती पद्धती असे वाटते. ह्या संकल्पनेला विविध कंगोरे आणि विविध स्तर आहेत. ही संकल्पना सविस्तरपणे समजून घेण्यासाठी हीचे विविध दहा पैलू मी या लेखात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणत्याही एका विशिष्ट परिस्थितीमध्ये हे सर्वच पैलू, गूणविशेष एकाच वेळी सारखेच आढळतील असे मात्र शक्य नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे ‘पारिवारीक शेती’ म्हणजे परिवाराच्या मालकीची शेती व त्यामध्ये केवळ परिवारातील सदस्यच काम करतात व शेती उत्पादन केवळ वापरतात वगैरे सारखा मर्यादित अर्थ या संकल्पनेचा नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. किंवा ती शेती किती लहान किंवा किती मोठी हा त्याचा भाग नसून ती शेती कशा प्रकारे केली जाते हा भाग महत्वाचा आहे. म्हणून ‘पारिवारिक शेती’ म्हणजे एक ‘जीवन शैली’ असे म्हणता येईल.

‘शेती’ व ‘परिवार’ या दोहोंचा समतोल
‘शेती’ व ‘परिवार’ या दोहोंचा समतोल परीवारीक शेती संकल्पनेचे दहा पैलू / गुण विशेष आपण अधिक समजावून घेऊ.

प्रमुख संसाधनावर परिवाराचे नियंत्रण
प्रमुख संसाधनावर शेतकरी कुटुंबाचे नियंत्रण असणे हा अत्यंत महत्वाचा पैलू आहे. यामध्ये यंत्रसामग्री इ.चा समावेश होतो. विशेषतः या सर्व साधनांचा व संसाधनाच्या योग्य वेळी योग्य वापर कसा करायचा याचे ज्ञान महत्वाचे असते. बाजार, सहकार, केडीट इत्यादी संस्थाचे जाळे, त्यामध्ये परिवाराची पोहोच व समान भागीदारी हा भाग सुद्धा महत्वाचा असतो. परिवारिक शेतकरी या सर्वांचा वापर केवळ नफा मिळवण्यासाठी नव्हे तर एक ‘जीवन पद्धती’ उभारण्यासाठी करीत असतो. त्यातून एक सुखी समृध्द जीवन जगता येईल व शेती अधिक समृध्द बनवण्यासाठी गरजे नुसार कांही गुंतवणूक करता येईल. या मध्ये गरजेनुसार यंत्रसामुग्री, सिंचन व्यवस्था किंवा परिवाराने स्वतः उभारलेली आवश्यक वापर गरजेनुसार करणे देखिल आंतभूत होते.

शेतीसाठी प्रमुख श्रम परिवारातील सदस्याचे
ह्या संकल्पनेचा दुसरा पैलू म्हणजे शेती करण्यासाठी लागणारी मेहनत ही त्या परिवारातील सदस्याचीच जास्त असते त्यातूनच अशी शेती हे सदस्यांच्या कठोर परिश्रमातून, त्यांच्या त्यागातून आणि भावनिक गुंतवणुकीतूनच विकसीत होते आणि कुटुंबाच्या आणि उपजीविकेचे भक्कम साधन बनते.

शेत व परिवार यातील मजबूत नाते
कुटुंबाच्या अनेक गरजा शेत भागवते आणि कुटूंब देखिल खूप कांही शेतीला पुरवते असे अगदी घट्ट व विकास कसा घडवून आणायचा या बाबतचे निर्णय घेतले जातात. शेतीवर खाणारी तोंडे आणि शेतीला फुलवणारे तेच बाहूबळ असे प्रत्येक शेताचे संतुलीत नाते ठरलेले असते. हे नातेच ख-या अर्थाने ते ‘शेत’ आणि ‘परिवार’ यंना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवत असते. दुस-या भाषेत जर परिवारातील बहुतेक सदस्यांची भूक बाजारातील/ बाहेरच्या वस्तूमुळे भागत असेल तर हे नाते ठिसूळ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी ‘शेती’ चा उपयोग केवळ नफा मिळण्यासाठी होऊ शकतो व जीवनशैली पूर्ण बदलून जाऊ शकते. नाते संपुष्टात येऊ शकते . भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांची सांगड

पारिवारिक शेती
परिवाराच्या गरजा व अन्न पुरवते केवळ मालकी आणि श्रम या पलिकडे जाऊन पारिवारिक शेती त्या परिवाराच्या ब-याच गरजा आणि लागणारे अन्न पुरविते. अन्न धान्यावर नियंत्रण असणे, आणि असे अन प्रदूषित नसल्याची खात्री असणे हे आता खूप महत्वाचे झाले आहे. पारिवारिक शेती मध्ये हे नियंत्रण आणि खात्री सहज प्राप्त होते.

निर्मिती ठिकाण (कारखाना) नव्हे तर घर
पारिवारिक शेती करणा-या शेतक-याची शेती हे केवळ निर्मितीचे ठिकाण किंवा कारखाना नसतो तर ते घरच असते. ती त्यांची स्वतःची जागा असते. आसरा देणारी ती जागा असते. आधार, पाठिंबा आणि खळ देणारी ती जागा असते. कुटुंबाच्या वास्तव्याची जागा असते. तेथे मुले लहानाची मोठी होत असतात.

शेतकरी परिवार हा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्य काळात जोडणा-या प्रवाहातील महत्वाचा दुवा
थोडक्यात प्रत्येक शेताला एक इतिहास असतो. अनेक आठवणींचा खजिना असतो तो. आई वडील आपल्या मुलांसाठी या शेतावर काम करीत असतात. ते आपल्या मुलांना त्यांच्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी एक ठोस पर्याय शेतीतच किंवा शेतीच्या बाहेर – देण्याचा प्रयत्न करीत असतात. याच प्रकारे ह्या शेतीतच पिढ्द्यान पिढ्या जन्माला येत असतात. त्यांचे भाग्य/ भविष्य घडत असते, ही शेती त्यामुळेच एक अभिमानाची जागा होऊन राहते. ह्या जागेचा (शेतीचा) जर कोणी विनाश करू पहात असेल किंवा नुकसान पोहोचवू पहात असेल तर चीड निर्माण होते.

परिवारिक शेत ही अशी जागा आहे की तेथे अनुभवंचे गाठोडे पहावयास मिळते
ह्याच ठिकाणी शिकवण होते. शिकवण साठवली जाते. एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जाते. अगदी सहज पण ठोस शिकवण होते. शेती क्षेत्रातील तो एक छोटासा बिंदू असतो, जेथे पद्धती विकसीत होतात, नवे बीज निर्माण होतात व सर्वत्र पसरतात.

पर्यावरणातीलच एक भाग
संस्कृती निर्मीती व जतन
‘पारिवारिक शेती’ म्हणजे केवळ नफा मिळवण्याचे आर्थिक साधन नव्हे पण अशी जागा की जेथे सातत्य आणि संस्कृती जोपासली जाते. शेती निष्ट कुटूंब हे संपूर्ण ग्रामीण समाज Network चा हिस्सा असते व अनेकदा ते शहरापर्यंत जावून पोहोचते.

‘पारिवारिक शेती’ मधील ‘परिवार’ आणि ‘शेत’ हे दोन्ही ग्रामीण अर्थकारणाचा महत्वाचा हिस्सा आहेत
त्या त्या स्थानिक स्वभाव विशेषाचे व सांस्कृतिक चालीरितीचे ते अविभाज्य भाग आहेत. यातूनच ते स्थानिक अर्थकारण मजबूत करतात. याच अर्थकारणात त्यांना जे हवे ते विकत घेतात, त्यांच्याकडे आहे ते विकतात (विनिमय करतात) आणि इतर घडामोडी सोबत जोडले जातात.

पारिवारिक शोती – व्यापक ग्रामीण वास्तवाचा भाग
‘पारिवारिक शेती’ व्यापक पातळीवर निसर्गाशी मिळतं जुळतं घेणारी किंबहुना निसर्गाचा एक भागच असल्या सारखी आहे. निसर्गाच्या विरोधात न जाता, नैसर्गिक प्रक्रियांच्या आधारावर, किंबहुना त्या प्रक्रियाना टिकवण्यासाठी पुरक म्हणजेच पारिवारिक शेतीपद्धती होय. ही पद्धत निसर्गातील जैवविविधता टिकवण्यासाठी मदत करते आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग शी लढत देऊ शकते.

स्वातंत्र्य आणि स्वायत्तता
पारिवारिक शेती मध्ये स्वायत्ता असल्यामुळे त्याचे एक वेगळे आकर्षण आहे. यामध्ये दोहोबाजुनी स्वातंत्र्य आहे. यामध्ये दोहोबाजूनी स्वातंत्र्य आहे. – एक म्हणजे बाहेरील शोषण कर्त्यांपासून स्वातंत्र्य आणि दुसरे म्हणजे स्वतःच्या इच्छा/ गरजानुसार काम करण्याचं स्वातंत्र्य आहे. या सोबतच रोजच्या कामामध्ये जीवंत निसर्गाशी सातत्याने देवाण घेवाण असते. परिवारिक शेती म्हणजे शारिरीक व बौद्धिक श्रमांचा सुरेख संगमच आहे, ज्यामध्ये काम व जीवन संस्थांच आहे की जी सद्याच्या भांडवलशाही विश्वात सातत्याने निर्मीती करीत राहते. अगदी प्राणवायू नसलेल्या वातावरणात एखाद्या बॅक्टेरियाने जगण्यासारखे हे निर्मितीचे काम अविरत चालूच राहते.

ह्याचे महत्व काय?
पारिवारिक शेती मुळे जास्त उत्पादन क्षम, शाश्वत, बदलता येण्यासारख्या, प्रतिसादात्मक, नाविण्य पूर्ण व जिवंत अशा शेतीच्या विविध पध्दती विकसित होतात, जतन होतात. ह्या सर्व समावेशकते मुळे पारिवारिक शेती अन्न सुरक्षा व अन्न सार्वभौमत्वा मध्ये मोठा वाटा उचलण्याची शक्यता असते. विविध मार्गानी ही शेती पध्द्ती आर्थिक विकासामध्ये भर टाकू शकते, रोजगार व मिळकत वाढीचे मार्ग निर्माण करू शकते. समाजातील मोठ्या संख्येने लोकांना यामुळे काम मिळू शकते आणि अशा दारिद्रय़ामध्ये असणाच्या अनेकांना दारिद्रय़ाच्या संकटातून बाहेर काढू शकते. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे पारिवारिक शेती प्रणाली ही निसर्गाची सुंदरता व जैवविविधता टिकवण्यामध्ये सिहांचा वाटा उचलणारी ठरू शकते.

बाहेरील धोके
पण ह्या सर्व फायद्याच्या बाबी अगदी अशक्य होण्याच्या शक्यता ही आहेत. फोल ठरण्याच्याही शक्यता आहेत. आज वास्तविकपणे पारिवारिक शेती प्रणाली ला दुबळे बनविले आहे. शेतमालाच्या किंमती कमी झालेल्या असतात पण शेतीचा लागत खर्च मात्र वाढलेला असतो. बाजारचा लहरीपणा मुळे कोणतेही दूरवरचे पीक नियोजन करणे दुरापास्त होते. कांही वेळा बाजारा सोबत वाटाघाटी शक्य नसतात. कृषि धोरणांमध्ये पारिवारिक शेतीला स्थान नसते. जमिन आणि पाणी ही महत्वाची संसाधने मोठ्या भांडवलदारानी काबीज केलेली असतात. आणि अशा अवस्थेमध्ये ‘पाविारिक शेती’ संकल्पना राखवणे महाकठीण/ अशक्य होते. व्यापक समाजाला योगदान देणे सोडाच पण स्वत:च्या परिवारासाठीचे योगदान सुध्दा अशक्य होऊन बसते. याच कारणामुळे शब्दात सांगायचे तर जगातील 70 टक्के गरिख लोक हे ग्रामीण परिसरातच राहतात कारण ते सर्व पारिवारिक शेती करत होते. आणि आता ती पारिवारिक शेती कोडमडली आहे. म्हणून ते सर्वजण दारिद्रयामध्ये आहेत.

अंतर्गत धोके
या पध्दतीमध्ये आतंर्गत धोके देखील आहेत. आज वास्तविक शेती ही एखाद्या उद्योगासारखीच होऊ शकते असे बोलले जाते. नफा मिळवण्यासाठीच शेती करणे परवडते असे सर्वांनाच वाटते. कांहीच्या मते असे केल्यास कदाचित आताची तरूण पिढी शेत मध्ये थोडा तरी टिकाव धरतील. थोडक्यात परिवारिक शेती आता जीवन पध्द्ती नव्हे तर एक ‘उद्योग’ ह्या दृष्टीने पाहणे योग्य या विचार धारे नुसार दक्षिण मधील (Global South)’पारिवारिक शेती’ चे सक्र्मण उत्तरीय देशात जसे झाले त्या प्रमाणे सुधारित शेतीमध्ये करावे लागेल.

युरोपमध्ये असा बदल सर्वत्र घडून आला आहे. या मध्ये परिवारिक शेती पध्द्तीचे वर मांडलेले सर्व पैलू संपूष्टात येऊन केवळ ‘कामगार पुरवठा’ एवढाच एक भाग त्या मध्ये शिल्लक राहतो असे दिसते. तसे पहायला गेले तर ही बदललेली औद्योगिक शेती अजूनही ‘कुटूंबाची शेतीच’ आहेत परंतू त्या मध्ये व ‘पारिवारिक शेती’ मध्ये बरेच मुलभूत फरक आहेत. सर्वात महत्वाचा फरक असा की खरी पारिवारिक शेती ही जाणिवपूर्वक नैसर्गिक, आर्थिक आणि मानवी संसाधनाचे उत्तम व्यवस्थापन करून आणि पूर्वीच्या पिढीपासून चालत आलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून वाढवली जाते. परंतूऔद्योगिक शेती पध्द्वती मध्ये इतरांची कौटूंबित शेती हस्तगत करून औद्योगिक पध्दतीने ती वाढवली जाते. ह्यामुळे पारिवारिक शेती पध्दती टिकवायला सर्वात मोठा अंतर्गत धोका निर्माण होतो. आज आपण हे सर्वत्र पाहतो आहोत.

पारिवारिक शेती-छोटी शेतीच्या दिशेने
याबाबत परसरविरोधी मानसिकता आहेत. अनेक ठिकाणी पहायला मिळते की पारिवारिक शेती पध्दती मध्येच कांही छोटे मोठे बदल करून ही पध्दती आणखी मजबूत बनवली आणि कुटूंबाचे उत्पन्न वाढवले. उदारहणार्थ शेती – पर्यावरणीय मूलतत्वाना अनुसरून, नविन उपक्रमाची विकून अशी शेती प्रणाली वाढीव उत्पन्न देणारी व मजबूत बनवल्याची अनेक उदाहरणे आहेत.

विश्लेषनात्मक दृष्ट्द्या ह्या नविन गोष्टींना आत्मसात करण्याच्या रणनितिलाच पुन्हा पारिवारिक शेती प्रणालीच्या दिशेने जाणे असे म्हटले जाते. हे एका अर्थाने छोट्या शेतीत रूपांतरीत झाल्या सारखे वाटते. परंतू पारिवारिक शेती प्रणाली मजबूत केली जाते. म्हणजेच छोटी शेती एका अर्थाने पारिवारिक शेती प्रणालीला समर्थक आणि वाचवणारीच ठरते.

काय करावे?
अगदी प्रतिकूल अवस्थेमध्ये सुध्दा ‘पारिवारिक शेती’ पध्दती तग धरून राहू शकेल. परंतू अनुकूल पारिस्थिती निर्माण झाल्यास ही शेती प्रणाली सर्वांगाने उच्चांक गाठेल. म्हणजेच यासाठी धेय धोरण बनवण्याची मोठी जबाबदारी संबधित देशाचे सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था (उदा. FAO, IFAD, सयुक्त राष्ट्र संघ)राजकीय पक्ष, सामाजिक चळवळी आणि समस्त नागरी समाज यांच्यावर जाते.

त्यांच्या मुलभूत हक्कांची हमी, पायाभूत संरचना उभारणीवरील गुंतवणूक संशोधन व विस्तार शिक्षण, नविन बाजार व्यवस्था, सामाजिक सुरक्षा, आरोग्याची हमी अशा मुलभूत सुविधा व अधिकारांची हमी दिल्यास शेतीकरी परिवार स्वतःचीच गुंतवणूक वाढवून ‘पारिवारिक शेती’ प्रणालीला प्रोत्साहन देतील. या गोष्टीला ‘अन्न व सकस आहार – उच्चस्तरीय तझ सामितीने अलिकडेच दुजोरा दिला आहे.

ग्रामीण लोकांच्या संस्था संघटना बळ देवून त्याना पुढे आणणे तितकेच महत्वाचे आहे. आपण हे मान्य केले पाहिजे की जगाच्या पाठीवर कोठेही शेतकरी कुटूंब हे बदलत्या परिस्थितीत तोंड देऊन अगदी कठिण परिस्थितीचा सामना करण्यास ही तयार आहेत. नविन मार्ग शोधत आहेत. अशा नविन व यशस्वी प्रयोगांना शोधांना समजणे; त्यांना नीट पोहोचवणे व बदलाच्या प्रवाहात त्यांना पाठबळ देणे हे आपल्या सर्वांच्या समोरचे मोठे काम आहे. बरेच काही करण्यासारखे आहे. आंनदाची बाख ही आहे की अगदी लहान सहान योगदान, बदल एका मोठ्या बदलाचा भाग असतो, मोठा बदल साकारतो.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular