पौर्णिमा आणि अमावस्या हा खेळ चाले आभाळी
यातही माणूस आपलेच तर्क लावतो भारी
पौर्णिमा म्हणजे शुभसंकेतच देणारी
अमावस्या मात्र नेहमीच अशुभ बिचारी
पौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो दाट रात्री
अमावस्येच्या रात्री मात्र घट्ट काळोखी
नसे यात कोणतीच तर्कशक्ती
हे तर फक्त नैसर्गिक चक्र असती
अमावस्येला जन्मले ते अशुभ मानूनी
पौर्णिमेला जन्मलेले मोठा तीरच मारी
अहो जाऊन विचारा माझ्या राजाला
कित्येक गड गाठले त्या अमावस्येला
प्रकाशात नसते हो नजर त्या मेणबत्ती कडे
पण अंधारातच एखादा दिवा जन्मास येते
अमावस्येत केलेले काम पूर्णत्वास कुठे येते
मग पौर्णिमेला केलेले प्रत्येक काम पुण्यही कुठे असते
दिवसा समान रात्री ही तेवढीच महत्त्वाची असते
मग सांगा पौर्णिमा समान अमावस्या ही गरजेची असते
सोयीप्रमाणे आपणच ग्रहांची रूपरेषा आखली
आपण माणसंच मग शुभ- अशुभाच्या जाळ्यात अडकली
अमावस्येला चिमणी चिवचिवते पौर्णिमेला गाय ही हंबरते
निसर्गानेच हे बनवले,घडवले , स्वीकारले
आपण मात्र ते बदलण्याचा प्रयत्नात ठाम राहिले
आपण मात्र ते बदलण्याच्या प्रयत्नात ठाम राहिले…
कवयित्री- नेहा नितीन संखे
( बोईसर )
समन्वयक – पालघर जिल्हा
[…] पौर्णिमा – अमावस्या विजय वैशाली दत्ताराम पराडकर […]
[…] पौर्णिमा – अमावस्या विजय वैशाली दत्ताराम पराडकर […]