बदलत गेली माणसं,बदलत गेली नाती
हरवली माणुसकी,विसरली मायमाती.
जमाना असा आला,आपला परका झाला
प्रेम माया जिव्हाळा,आज सांगा कुठे गेला.
पैशासाठी धावे जग,कुणी कुणाशी बोलेना
पद प्रतिष्ठेचा अहंकार,मातीवर तो चालेना.
स्वार्थ टोकाला चालला,ओरबाडून खाऊ लागला
इतका आंधळा झाला, पशुच होऊन गेला.
नियती इतकी क्रूर,नाही सोडणार काळ
डोळे उघड बाळ,अजूनही हाती वेळ
मानवता तू जपावी,कर राया तू सत्कर्म
विसरू नको नातीमाती, कृष्णा सांगतो धर्म.
कवी - किसन आटोळे
(वाहिरा ता. आष्टी)
मुख्यसंपादक
👏👏