मुली कशातही कमी नाहीत हे आजकाल महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत दाखवून दिलं आहे. त्यामुळे महिला क्रिकेट संघाला ही चांगले दिवस येत आहेत ही आनंददायी गोष्ट समोर येत आहे. सद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सुरू असलेल्या टी 20 मालिकेत पांडेंने केलेली जबरदस्त बॉलिंग प्रेक्षकांना खूपच आवडत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे त्यांनी तिच्या एका बॉल साठी तर बॉल ऑफ द सेंच्युरी असे म्हंटले आहे.
स्टॅम्प च्या फूटभर बाजूला पडलेला बॉल अचानक वळला आणि अचूक दांड्याचा वेध घेत फलंदाज अलिसा हिची विकेट पडली . यामुळे सर्वाना एक सुखद अनुभव आलाच पण देशभर तिच्या या बॉलिंग चे कौतुक होत आहे . अनेकांनी तर तिच्या या बॉल चे वर्णन करताना असा बॉल शभर वर्षात एकदा पडतो असे वर्णन करून तिला दाद दिली.
या टी20 मालिकेत पहिला सामना पाऊसा मुळे अनिर्णित ठरला त्यामुळे दोन्ही संघामध्ये चुरस होती.
या सामन्यात भारताने फक्त ११८ धावा केल्या होत्या , ऑस्ट्रेलियन टीम ने सुद्धा काही विकेट गमावल्या तरी त्यांच्या मधल्या पार्टनरशिप च्या जोरावर या सामन्यात विजय मिळवला असला तरी त्यांच्या विजयापेक्षा जास्त चर्चा शिखा च्या बॉलिंग ची होती असे म्हंटल तरी वावगे ठरणार नाही.
- संकलन – टीम लिंक मराठी

मुख्यसंपादक