करुनी पोरकी सान सानुली,
अचानक निघुनी का गेला
सांग ना आई
का ग मजला सोडूनी बाबा गेला.
आठवतो ग आई मजला,
बाबांचा तो चेहरा हसरा.
तो ही आवडला का देवाला
मला सांग ना.
त्यांना न्यायची त्याला का झाली होती घाई,
देव आहे ना तू
तुला माझं काहीच कसं वाटलं नाही.
कुशीत त्यांच्या झोपायचे
राहूनच गेले,
अन् कुशीतल्या गोष्टी ऐकायचे
आता स्वप्न सुध्दा विरून गेले.
का देवा असा तू निष्ठुर वागलास,
बाबाच्या मायेला मला
पोरकी करून
माझ्या नशिबाला फक्त हसत राहिलास.
माझ्या शाळेतील गमतीजमती
आता कुणा मी सांगू?
पाठीवरती खंबीर मायेचा हात
आता कुठे मी शोधू?
आईची कुशी आहे ते देवा
मला सावरायला
पण बाबाचा मायेचा आधार
आता मी कुठून घेऊ.
बाबा गेल्याचं दुःख
नाही रे झेपवत या बालमनाला,
साऱ्या खेळण्यापुढे
आमचा बाबाच प्रिय असतो आम्हाला.
करायचं असलं तर एक कर देवा
आम्हा लेकरापासून बाबा असा
अवचित हिराऊ नकोस देवा.
आम्हा लेकरापासून बाबा असा
अवचित हिराऊ नकोस देवा.
अस नको होत करायला देवा
का माझ्या बाबंचापण तुला वाटला होता हेवा?
- भूषण कौशल्या लक्ष्मण मडके

मुख्यसंपादक