काळा माणूस

मी दहा पंधरा वर्षांच्या
कालखंडानंतर
जेंव्हा त्याला पहील्यांदा
पाहील
तेंव्हा त्यावेळचा तो
आणि आजचा तो
यांच्यात मला खुपचं
तफावत जानवत होती
पण…..जानवल
त्याचं अंतर्मन मात्र
तसंच होतं . किंबहुना ते
पहील्या पेक्षा अधिक
परीपक्व आणि
खंबीर बनलं होतं
त्यावेळी त्याच कॉलेज
मधले पहीले पाऊलच
कित्येक तरुणींच्या
हृदयाची धडधड
वाढवायचं.
इतका तो होता
गुजगूजीत गोरा
सर्वांनाच हवाहवासा
होता त्याचा संबंध तोरा
त्याच हासनं, खेळनं,
वागनं,बोलनं
,चालणं होतं सगळ्यांसाठी
सगळ्यांचं .
पण..
आज त्याला पहील्यांदाच
पाहील्याबरोबर मला
रहावेलेच नाही, नाही रहावेले
माझ्या मनाला,नाही रहावेले
माझ्या शब्दानां
तब्बेतीण जरा जास्तच
उतरलाय रे असा कोनतासा
व्याप लागलाय तूझ्या मागं
लेकरं बाळं संसार तर
सगळ्यांनाच असतो
कि पून्हा जास्तीचा
झांगडगूत्ता लागलाय मागं
कि उरवतोस पून्हा
कोनतीसाठी काही वेगळंच …
पोरींच्या माग माग फिरताना
आम्हांला एक नाही गावल
अन् त्याला रोज बदलुन फुल….
कॉलेज मध्ये असताना
मूलींच्या बाबतीत बोलायचो
त्या शब्दांत विचारलं
तेंव्हा तो खदकण हसून म्हणाला
नाही रे….तसं काही नाही
त्यानं त्याचा दिनक्रम
सांगायलाच सूरवात केली
तसं त्यांच्या बद्दल आदर
आणि कर्तुत्वाच्या बाबतीत
तो किती पूढ गेलाय
बाकीच्यां पेक्षा
हे मला जानवाय लागलं
नोकरीच्या माग चप्पल
झीजवण्या पेक्षा
आपलं शरीर झीजवल
होतं त्यानं शेतीसाठी
मातीत काम करतांना
तो घरची तानलेली
अर्थव्यवस्था सांभाळताना
झाला होता अर्थमंत्री.
अन् नियोजन खात तो
स्वता: सांभाळून होता
कामगार ते मंत्री मंडळ
हि सर्व त्याचीच जबाबदारी होती
सद्धस्तितीत तो मला
बेचैन जगतानां दिसत होता
मात्र त्यांच्याकडे बघून
भविष्यकाळ त्याचा चैनीचाच
आहे हे लक्षात येते होते
गूबगुबीत गालांना दाभाडे बसून
पडले होते खड्डे
अन् मातीत राबतानां
तो झाला होता गोर्याचा काळा
मातीसारखा …
निष्क्रिय माणूस नाही तर
कर्तव्यदक्ष
अस्थीर निसर्गस्थैर्याच्या
लहरीपनासी झगडावं लागनारा
एक काळा माणूस, एक काळा माणूस
एक काळा माणूस

  • जगन्नाथ रावसाहेब काकडे (मेसखेडकर )
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular