माणसाने माणसाशी
माणसासारखे वागा
प्रत्येकाच्या हृदयात
मानवता धर्म जागा
जातिभेद धर्मभेद
कदापिही करू नका
दुःखीतांना साह्य करा
नका देऊ कुणा धोका.
मनी नसावे कपट
जगा जीवन उदार
नीतिमत्ता ठेवा तुम्ही
हेच जीवनाचे सार
शब्द जपून वापरा
नका दुखवू कोणास
द्यावा आधार प्रेमाचा
ठेवा आनंदी जनास
जरी धर्म भिन्नभिन्न
रंग झेंड्याचे वेगळे
रक्त लालच साऱ्यांचे
मनुष्यच ते सगळे
साह्य करा गरजूंना
द्यावा मदतीचा हात
मानवता माना धर्म
माणुसकी हीच जात
कवी :किसन आटोळे
वाहिरा ता.आष्टी
मुख्यसंपादक
मनपूर्वक आभार