Homeमुक्त- व्यासपीठवटपौर्णिमा स्पेशल सावित्री

वटपौर्णिमा स्पेशल सावित्री

रविवारचा आळसावलेला दिवस …
आज जरा मस्त मूड मध्ये जाऊन आठवड्याचा भाजीपाला , काही शॉपिंग करून बाहेरच लंच करून घरी यायचे म्हणून नेहा….सुमित सह बाहेर पडली . दोघे ही IT कंपनी त मोठ्या पदावर कार्यरत ! नेहा प्रचंड हुशार , अभ्यासू व्यक्तिमत्व ! पाहताक्षणी हुशारीचे तेज तिच्या चेहऱ्यावरून जाणवत !
सुमित ही तेवढाच लाघवी प्रेमळ , हुशार ! दोघांची जोडी पहात राहावी अशीच ! लोकांना त्यांचा हेवा वाटे . काही बुद्धिमान लोक कधीच भांडण नाहीत, समजुतीने
मार्ग काढत आपल्या वाटा चोखाळतात !

 नेहा , सुमितने लग्न झाल्यावर महिनाभरात वेगळे बिऱ्हाड थाटले याचे कारण म्हणजे प्रत्येकाला स्वतःची अशी वेगळी स्पेस मिळावी आणि कंपनी पासून जवळच फ्लॅट घेतलेला ! सासू सासरे अजूनही फिट , तब्येत राखून होते .

दीर – जाऊ डॉक्टर सदैव बिझी ! त्यांचे रात्री – अपरात्रीचे शेड्युल पण या कुटुंबातील सणवार एकत्र , शिवाय आठवड्या तुन एक दिवस तरी सर्वांनी एकत्र यायचे , विचार – विनिमय करायचे असे ठरलेले !

 आज वटपौर्णिमेचा दिवस घरातच छोटेखानी पूजा करून दोघेही नवरा बायको बाहेर पडले . पार्किंग मध्ये येताच समोरून सावित्री तिच्या सासू बरोबर हातात पूजेचे तबक घेऊन , जरी काठाची साडी नेसून अंगभर दागिने लेऊन पूजेला सासू बरोबर निघाली होती किंबहुना गपगुमान सासू च्या आज्ञेनुसार ! सावित्रीची व नेहा ची नजरानजर झाली . तशी सावित्री कसेनुसे हसली . तिच्या डोळ्यातील नाराजीची छटा , करुणा पाहून नेहाला खूप वाईट वाटले.

  मागच्याच आठवड्यात सावित्रीची आणि नेहाची भेट झालेली ....सासू - सासरे काही कामानिमित्त दिवसभर बाहेर गेलेले ....

तेंव्हा सावित्री
नवऱ्याची परवानगी काढून नेहाच्या भेटीला आली होती .

...नेहा विचारमग्न झाली ...काय आयुष्य हिचे ! ....सावित्री MA .B Ed झालेली , सांगली सारख्या छोटेखानी गावात प्रोफेसर म्हणून नुकतीच रुजू झाली होती ....आई वडिलांची एकुलती एक मुलगी ...छोट्या भावाचा पुण्यात शिकत असताना Accident झालेला....

अशा अनेक घटनातून नुकतेच हे कुटुंब सावरले
होते .

 शाळेत असल्यापासून

सावी ला इतिहास , भूगोल , राज्यशास्त्र वगैरे अभ्यासात रुची ! शाळेत
प्रचंड हुशार , सगळीकडे सावी चा नंबर अव्वल !
तिला लाडाने सगळे सावी च म्हणत ! तिला ही ते आवडे ! आणि शाळेत असल्यापासून सावी हेच नाव दाखल झालेले पण लग्नानंतर सासू ने अट्टाहास करून सावी चे सावित्री नामकरण केले !

  दहावी Distinction मध्ये उत्तम मार्काने पास झाल्यावर तिने जाणीवपूर्वक आर्ट्स ला प्रवेश घेतला . तिच्या यशाचा आलेख वाढतच होता . वक्तृत्व स्पर्धेतील तिचे भाषण खूपच प्रभावी ठरत ! एकदा असेच एका ठिकाणी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ती निघाली .

बसमध्ये तिचा कॉलेज सहकारी अनय याची भेट झाली . दोघांचे आचार विचार जुळले ….कॉलेज मध्ये मैत्री फुलली . मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले . अनय ही खूप हुशार होता
मध्यम वर्गीय कुटुंबातील होता .

 सावी च्या घरी या गोष्टींची कुणकुण लागली 

…..तसे आई – वडिलांनी सावी ला परिस्थिती , समाज याची जाणीव करून दिली …..तसे सावी ने अनय शी असलेले संबंध हळूहळू कमी केले ….!

 नुकतीच सावी एका कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून रुजू झाली . योगायोगाने एका कार्यक्रमात पुन्हा सावी न अनय एकत्र आले ! अनय

ने सावी कडे खुलासा मागितला . लग्नाची मागणी घातली…विचार करून निर्णय घे ! मग मी घरी येऊन तुझ्या आई – बाबांशी बोलून सविस्तर मागणी घालेन असे सांगितले !

 अनय ला प्रॉमिस केल्यामुळे सावी त्याला भेटायला निघाली ...पिंक कलर ची गार्डन च्या साडीत सावी चे सौन्दर्य एखाद्या अप्सरेसारखे दिसत होते ....या भेटीत अनय शी लग्न करण्याचा निर्णय सावी ने घेतला . 

ठरल्याप्रमाणे अनय त्याच्या आई सोबत सावी च्या घरी मागणी घालायला आला !

अनय ला पाहून सावी च्या आईला आनंद झाला 

हा मुलगा आपल्या मुलीला छान सुखात ठेवेल याची तिला पक्की खात्री झाली . तिने मनातून होकार दिला . पण …..सावीचे बाबा मात्र गप्प गप्प होते ….!
चार दिवसांनी कळवतो सांगून त्यांची त्यांनी बोळवण केली ….त्याच रात्री सावी चे काका वगैरे कुटुंबाची बैठक झाली आणि अशा सामान्य , मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थिती असलेल्या घरात आपली मुलगी द्यायची नाही हा निर्णय एकमताने घेण्यात आला .
या शिवाय जात वेगळी असल्याने समाजाची भिती त्या पाठी होतीच !

....सावी वर हा खूप मोठा आघात होता . ती गप्प गप्प राहू लागली ...

महिनाभरात तिला या प्रवीण चे स्थळ सांगून आले . मुलगा पुण्यात बिल्डर Construction चा बिझनेस ! शिवाय पार्टी ही मोठी …. राजकारणात या कुटुंबाचा
दरारा ! …त्यांनी सावी ला मागणी घातली .

 .....सावी चा पसंती चा कोणी विचार च केला नाही . सावी च्या आई ला तिच्या मनोवेदना समजत होत्या . पण तिचे ही ह्या घराण्यापुढे काहीही चालत नसे ! सावी चे आई - बाबा समाजापुढे हतबल झालेले ! होकार देण्याशिवाय पर्याय च नव्हता !

  .....लग्न होऊन सावी चे नामकरण सावित्री त झाले ..पुण्यासारख्या ठिकाणी मोठा बंगला , घर , गाड्या कशाची कमतरता तिला नव्हती !

…..पण सावी मात्र दिवसेंदिवस उदास बनली नुकतीच लग्नाला तीन वर्षे
पूर्ण झालेली . सासू पाळणा कधी हालतो म्हणून वाट बघत होती . सावी ला उपास – तपास करण्याला भाग पाडत होती . नवरा प्रवीण ला सगळी व्यसने होती . रोज ड्रिंक्स घेतल्याशिवाय त्याला चैन पडत नसे ! शिवाय हल्ली तो राजरोसपणे ….एका बाई च्या प्रेमात गुंतत चालला होता . सावी हे उघड्या डोळ्यांनी पहात होती पण तिचा आवाज दाबून ठेवला होता !

तिचे शिक्षण वगैरे सगळे मातीमोल ठरले होते ....अशा अनेक अडचणींचा पाढा तिने नेहा पुढे मांडला होता !

 आणि आज सावित्री वटपौर्णिमा पूजेला जाताना नेहाला दिसली ..

का म्हणून ही पूजा तिने करावी ! नवरा बाहेरख्याली आणि ही सोज्वळ बनून वडाला फेऱ्या मारण्यात मग्न ! का तर समाजाला घाबरून ! का तिचा आवाज दाबला जातोय ?

  नेहा तावातावाने रात्री आपल्या कुटुंबियांपुढे तिची व्यथा मांडत होती ..

एका सुशिक्षित हुशार मुलीचा केवळ समाजाच्या भीतीपायी बळी जातोय ! ही कल्पनाच तिला मान्य नव्हती !

 शेवटी घरातल्या लोकांनी नेहाची समजूत काढली ....सांगितले ... "अग ! या साठी आपल्या

कुटुंबीयांचा भक्कम आधार आपल्या पाठीमागे ठाम असला पाहिजे ! “

  या लोकांनी अनय ला जात आणि मध्यमवर्गीय म्हणून नाकारले . आपली मुलगी सुखाच्या राशीत लोळावी म्हणून तिला तोला मोलाच्या , राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात दिले .इथेच त्यांचे

चुकले ! आणि एक लक्षात ठेव नेहा …आपण
या विरुद्ध काहीही करू शकत नाही ….तू सावित्री चा विचार डोक्यातून काढून टाक !

अगं ! श्रीमंतांचे शंभर गुन्हे माफ होतात . पण गरीबाची  एक चूक त्याला महागात पडते हे लक्षात ठेव !

   रात्री अंथरुणावर पडल्यावर विचार करून नेहा  चे डोके गरगरायला लागले . सुमित तिला हलकेच थोपटत होता . आपल्या नवऱ्याचे आपल्यावरील प्रेम , काळजी पाहून नेहा ला आजची वटपौर्णिमा सार्थकी लागल्याचा भास होत होता . जन्मोजन्मी हाच पती मिळू दे असे मनात घोळवत देवाला विनवणी करत होती......

मधूनच सुमितकडे पाहून हलकेच स्माईल देऊन त्याच्या कुशीत अलगद विसावली …..मनातील विचारांना तिलांजली देत !!

( सदरहू कथा काल्पनिक
आहे )

सौ . राजश्री भावार्थी
पुणे

   

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular