चालून आलेल्या स्वराज्यावर
प्रतापराव.. ठार मारीत नाहीस
तोपर्यंत तोंड दाखऊ नको आम्हास
धाडला छत्रपतींनी आदेश
माफी असावी राजे
हा कुडतोजी चुकला
अन्यथा धूळ चारली असती
त्या मोघली शत्रूला
मन कुठेच लागत नव्हते
राजे तुमचे पत्र वाचून
हा कुडतोजी पच्छतावला
बहालोलखानाला सोडून
नासधूस,उध्वस्त केले राज्य
चालून आला स्वराज्यावर
का म्हणून दिलात जीवदान
राजे संतापले सरसेनापतीवर
तो शरण आला म्हणून
राजे..तलवार मागे घेतली
अन्यथा त्या हरामखोराला
जिवंत नसती सोडली
वार्ता आली कानावर
तळ ठोकून होता नेसरीत
घोड्यांच्या टापांचे उधळले रणांगण
वेडात मराठे वीर दौडले सात
बारा हजार सैन्यावर
तुटून पडले सात वीर
जीवाची पर्वा न करता
त्वेशात चालली समशेर
जरी मृत्यू साक्षात
चिंता नव्हती मनात
शिवरायांचे होतें हुकुम
मावळे मरेपर्यंत होते लढत
आजपण विसाजी बल्लाळ, सिद्दी हिलाल
विठ्ठल अत्रे,दिपोजी राऊतराव
कृष्णाजी भास्कर, विठोजी शिंदे आणि
सरनौबत प्रतापराव या वीरांचे मी गर्वाने घेतो नाव
कवी:स्वप्नील चंदकांत जांभळे
गाव हातिप (तेलवाडी),
ता. दापोली, जि. रत्नागिरी,
मो.९६१९७७४६५६
Email: swapniljambhale6211@gmail.com
समन्वयक – पालघर जिल्हा