उभारिले स्वराज्य छत्रपती शिवरायांनी
प्राण ही अर्पिले आपूले शंभूराजांनी
कित्येक संकटे स्वराज्यावर आली
हटला नाही मागे परतून लाविली
सळसळते रक्त निधड्या छातीचा
शूरवीर राजा महाराष्ट्राच्या मातीचा
महापराक्रमी मुत्सद्दी राजकारणी
कवी साहित्यिक उच्च विचारसरणी
इतिहास फंदफितुरी जुनाच शाप
मृत्युला न घाबरला निघाला बाप
शौर्यगाथा या मातीच्या कणाकणात
देशभक्ती रुजली इथे मनामनात
शंभूराजे देशभक्ती आम्हा शिकवी
गुणगान गातो राजेंचे कृष्णा कवी.
– कवी किसन आटोळे सर
( वाहिरा ता.आष्टी )
मुख्यसंपादक
शंभूराजांना नमन 🙏