श्रावणी
राणमळ्याच्या वाटेनं
घेउन आलीस तु कविता
आमच्या काळजातल्या
कविता रानावनातल्या
कविता पानाफूलातल्या
कविता मनामनातल्या
दारातली पवित्र तूळस
वैशाखात फूलनारा पळस
पिकल्या पाडान लदबदलेली अंबराई
तूझे शब्द जसे गूलाब मोगरा जाई जुई
श्रावणी
तूझ्या मूखातून कवितेचा
भावगर्भ जेंव्हा उलगडतोना
तेंव्हा कविता मूठभरांची न होता
इतकी व्यापक बनते की
ज्यांना कधी कवितेचा लळाच नव्हता
त्यांनीही इतकं स्विकारलय कवितेला
तूझ्याच मूळे सर्वांनी…
श्रावणी
तूझाकड बघीतले ना
की वाटतं भल्याभल्यांना न
जमनारा कवितेचा ठेका तूला
जमलाच कसा…
कितीदा तरी ऐकलेली कविता
जेंव्हा तूझ्या तोंडून एकतो तेंव्हा
तेंव्हा ति वेगळीच वाटतें
आधीच्या पेक्षा..
इतकी तू एकरूप झालीस कवितेशी
अन् कविता तूझ्याशी
- जगन्नाथ काकडे
मेसखेडा
मुख्यसंपादक