Homeवैशिष्ट्येसुभेदार भीमराव बेलोसे यांची समाधी

सुभेदार भीमराव बेलोसे यांची समाधी

अर्नाळा किल्ल्याचे पहिले सुभेदार बाजीराव भिमराव बेलोसे यांची समाधी अर्नाळा किल्ल्याजवळ आहे. अर्नाळा किल्ल्या शेजारी राम मंदिरच्या समोर ही समाधी शेवटचे घटके घेत आहे. चित्रामध्ये स्पष्ट दिसत आहे की पूर्ण पिंपळाच्या झाडाने या समाधीला वेढले आहे.तसे म्हटले तर समाधी कमी आणि झाड जास्त दिसत आहे.झाडाच्या वेटोल्यामुळे जणू ही समाधी गुदमरू लागली आहे. जवळ गेले तर ही समाधी नाही तर देऊलच वाटते.पण त्या समाधीच्या दर्शनासाठी आतमध्ये प्रवेश केलात तर सुंदर कलाकृती पेशवेकालीन करण्यात आलेली दिसते.आतील बाजूस घुमट आणि नक्षीदार काम केलेले दिसण्यात येते.पेशवेकालीन सुबक चित्रे , कोरीव काम हे इतिहासातील साक्ष देत आहेत.बाजीराव चिमाजी अप्पा यांनी वसईची मोहीम आखली तेव्हा प्रथम पोर्तुगीजांनी काबीज केलेले अर्नाळा किल्ला जिंकणे जरुरी होते. जेवढे सागरी किल्ले होते त्यावर सत्ता काबीज करणे हे पेशव्यांनी ठरवले होते कारण स्वतः शिवरायांनी सांगितले होते परकीय सत्ता ही सागरीमार्गे आक्रमण करू शकते.त्यामुळे सागरीमार्ग स्वराज्यात असेल तर राज्य सुरक्षित राहील. सागरी मार्गाने या परकीय सत्तेचे मोठे व्यापारही चालत असे. लाकूड, दगड, धान्य, कापड असे अनेक प्रकारचे वस्तु बाहेरगावी निर्यात करत असत. वसई किल्ला काबीज करायचा असेल तर पहिले अर्नाळा किल्ला काबीज करावे लागेल असे शंकररावजी पंथ यांनी चिमाजी अप्पा यांना कानमंत्र आधीच दिला होता.थोडाही वेळ न घालवता शंकरराव पंथानी अर्नाळा किल्ल्यावरील पोर्तुगीजांनवर चालून जाण्यासाठी भिमराव बेलोसे , गंगाजी नाईक, रायजीराव सुर्वे आणि त्यांच्याबरोबर आजूबाजूचे ४०० लोक अर्नाळा किल्ल्यावर जिंकण्यासाठी पाठवले आणि २८ मार्च.१७३७ ला हा किल्ला काबीज करण्यास तेवढेच यश ही मिळाले. त्या पाठोपाठ चिमाजी अप्पा यांनी वसई मोहीम ही फत्ते केली.यामध्ये सुबेदार भिमराव बेलोसे यांची अर्नाळा किल्ल्याची मोहीम ची कामगिरी बघून त्यांना सुभेदार ही पदवी बहाल केली.तसेच अर्नाळा किल्ला बांधण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका ठरली होती. या किल्ल्याचे पहिले किल्लेदार म्हणून चिमाजी अप्पा यांनी भिमराव बेलोसे यांना सुभेदार ही पदवी बहाल केली. या समाधीचे बांधकाम उत्कृष्टपणे केले आहे.त्यावेळी सुभेदार बेलोसे शत्रूंच्या लढाईसाठी किती शूरवीर होते ते या समाधीवरून दिसून येते. ज्या ज्या वेळी परकीय आक्रमणे झाली त्या त्या वेळी या शूरवीरांनी आपल्या तलवारीने शत्रूला पाणी पाजले. पण आज याच समाधीला बघून मन सुन्न होते. एवढे महान कार्य करुन सुध्दा आज जो काही इतिहास उरला आहे. तो इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. असा जिवंत इतिहास जपायचा असेल आणि सुभेदार भिमराव बेलोसे यांच्या समाधीला मोकळे श्वास देयाचे असेल तर पुरातत्त्व विभागाने आणि तेथील स्थानिक प्रशासनाने ऐतिहासिक ठिकाणवर जाऊन लक्ष दीले पाहिजे.

स्वप्नील चंद्रकांत जांभळे
दापोली
मो.9619774656

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular