“स्याल्लूट टू सिफेरर्स”
सागरी जीव ………
ही गोष्ट आहे त्या सागरी जीवांची… ज्यांनी आपल्या सोबत च बालपण साजरे केले आणि शैक्षणिक काळात योग्य मार्ग निवडून ज्यांनी या करिअर मध्ये पदार्पण केले. यामध्ये २ भाग आहेत. एक नौदल आणि दुसरी मर्चंट नेव्ही.
१७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना “भारतीय नौदलाचे जनक” मानले जाते.भारतीय सैन्यात तीन विभाग आहेत. जसे आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स. नौदलाचे नाव इंग्रजीत ‘नेव्ही’ आहे. देशाच्या सागरी सीमेचे रक्षण करणाऱ्या सैन्याला नौदल असे संबोधले जाते. जहाजांवर चढून, नौदल समुद्रातील धोक्यांपासून देशाचे रक्षण करते.नौसेना म्हणजे सागराच्या पृष्ठभागावर व पोटात युद्ध करू शकणारी सैनिकी संघटना.भारतीय नौदल जलमार्गांवर गस्त घालते आणि सागरी संघर्षापासून देशाचे रक्षण करते. कधीकधी नौदल संपूर्ण महिनाभर समुद्रात असते. त्यांनी आपले जीवन देशसेवेसाठी समर्पित केलेले असते, आपल्या कार्यातून कुटुंबाकडे वेळ देण्यास यांच्या कडे फार कमी काळ असतो.
भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे युद्धनौकांच्या तोफा , हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट, डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.
तर इकडे ‘मर्चंट नेव्ही’ हे सागरामार्गे होणाऱ्या व्यापारी मालवाहतूकीशी संबंधित आहे. या मालवाहतुकीचं माध्यम म्हणजे जहाज, जहाजावर विविध प्रकारची कामं करणाऱ्या माणसांची गरज असते. मर्चंट नेव्हीमध्ये प्रामुख्याने डेक विभाग (नॉटिकल सायन्स) आणि इंजिन विभाग (मरीन इंजिनीयरिंग) असे दोन विभाग पडतात.मर्चट नेव्हीमध्ये डेक विभाग, इंजिन विभाग, सर्व्हिस विभाग हे तीन मुख्य विभाग असतात.
आज सागरी मार्गाने देशांतर्गत तसेच विदेशात मालवाहतूक, तेलवाहतूक, प्रवासी वाहतूक केली जाते ती मर्चट नेव्हीच्या आख्यारीत येत असते. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे व व्यापाराच्या दृष्टीने जगातील महत्त्वाचे बंदर आहे. येथून दररोज हजारो टन मालाची ने-आण होत असते. आज समुद्रीमार्गाने प्रवास करणार्यांची संख्या वाढली आहे. आशिया खंडात भारताचा सागरी वाहतुकीसाठी दुसरा क्रमांक लागतो तर जगात भारताचा दहावा क्रमांक आहे.
मर्चट नेव्हीमध्ये करियरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. कारण जहाजावर बरेच कर्मचारी काम करत असतात. सागरी सफर, जगाची भटकंती आदीमुळे होतकरू तरूण मर्चट नेव्हीकडे आकर्षित होत असतात.
जगातील एकूण व्यापारापैकी ९० टक्के व्यापार हा सागरी मार्गाने होतो. जवळपास ५० हजार पेक्षा जास्त जहाजं ही मर्चंट या प्रकारात मोडतात.
डेक विभागात या किंबहुना सर्व जहाजाचा प्रमुख हा ‘कॅप्टन’ असतो.या शिवाय कॅप्टनच्या मदतीला त्याचे सहकारी , चीफऑफिसर, सेकंडऑफिसर, थर्डऑफिसर हे हि असतात . समुद्रात असताना नौकानयनाचे जबाबदारीचं काम कॅप्टनला करायचं असतं. अथांग पसरलेल्या समुद्रात जहाजाचं स्थान होकायंत्र व तत्सम उपकरणं तसंच सूर्य वा अन्य ताऱ्याच्या स्थितीवरून निश्चितपणे वर्तवण्याचं काम कॅप्टनचं असतं. समुद्राचा विस्तार प्रचंड असला तरी कमीत कमी धोके असलेल्या पट्टयातूनच मालवाहतूक करणारी जहाजे प्रवास करतात. त्यामुळे जहाजांची टक्कर टाळण्यासाठी काळजी घेण्याचं कामही कॅप्टनवर असतं. जहाजात असलेल्या मालाची काळजी घेण्याची जबाबदारीही त्यांची असते.
नाशवंत मालासाठी वातानुकूलन व्यवस्था पुरवणं, आर्द्रतेचं प्रमाण योग्य ठेवणं, ज्वालाग्राही पदार्थ आगीपासून सुरक्षित ठेवणं इत्यादीची अंतिम जबाबदारीच त्याच्यावर असते. खवळलेल्या समुद्रातून किंवा धुक्याने भरलेल्या वातावरणातून जहाज सुखरूप बाहेर काढण्याची जोखीमही त्यांना घ्यावी लागते. त्याचबरोबर जहाजावरील जीवनावश्यक गोष्टींचा पुरेसा साठा ठेवणं, बंदरावर लागल्यानंतर मालाच्या चढ-उतारीवर लक्ष ठेवणं व आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय नियमांचे व कायद्याचे पालन करणं हे कॅप्टनला तसे इतर सहकाऱ्यांना करावं लागत.
मर्चंट नेव्ही हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कणा आहे. यांच्या शिवाय आयात-निर्यात होणे कठीण आहे.
या क्षेत्रात पाय ठेवणे जितके अभिमानाचे आहे तितकेच जबाबदारीचे ही , बराच कालावधी बरेच महिने प्रत्येकाला कुटुंबापासून , आप्तेष्टा पासून , मित्र मंडळी या पासून दूर राहावं लागत. कुणाला या करिअर ची आवड असते तर कुणाला आई वडिलांच्या स्वप्नांना आकार द्यायचा असतो. आणि शिवाय काहीजण ” पोटासाठी १२ वाटा ” या म्हणीनुसार बऱ्याच लोकांना अश्या पैकी करिअर निवडावे हि लागतात आणि ते एक दिवस यशस्वी हि होतात.
सामान्यातून असामान्यत्व काय असत यांच्या कडून शिकावं, रोज सांयकाळी जहाजाच्या दूर किनाऱ्यावरून सूर्य येताना जाताना याना पाहत असतो.पहाटेचा सूर्योदय कुणाला नाही आवडत. अगदी तांबूस तांबूस किरणांनी अक्खा आसमंत उजळून पक्ष्यांच्या किलबिलानी त्या पहाटेला एक वेगळीच रिंगटोन येऊन जाते.
एका नेव्ही मॅन ला तो सूर्यास्त पाहून काय शब्द सुचत असावेत अशी एक कविता सुचली आहे , त्यांच्या जागेवरच जगणं थोडं आत्मसात करून मी हि कविता शब्द बद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
तो मावळताना मला पाहत होता,
जसा उगवताना जगण्याला सामर्थ्य देत होता.
रोजच तेच उठण तेच कामकाज,
वर्क लोड मध्ये देखील सोबत च आता तो ही हात देत होता.
सूर्योदय होताना अगदीच बुडालेला काल जसा गेला तसाच आज परतून आला होता,
का कुणास ठाऊक भास की आभास होता समुद्राच्या तळाला जाऊन कुठेतरी लपला होता ?
समुद्राच्या खोल कुठेतरी जात असावा की ,
अंतरिक्षात कुठेतरी फिरस्ती करत असावा,
चंद्र चांदण्या सोबत रात्रीचा वस्तीलाच जात असावा……???
कोडे उलगडत होते की मीच त्याला कुठे तरी पाठवत होतो,
हा मात्र माझा मलाच प्रश्न होता.
पहाटेच्या व्यायामाच्या सुरुवातीलाच त्याच दर्शन व्हावं..
दिवसभर भर त्याने सफेद चंद्राचं तीक्ष्ण रूप धारण केलं असावं.
हे तर नेहमीच होत,
विशेष होत ते समुद्राच्या थेंबात थेंबात लख लखित चमकत होत.
जस रात्री चंद्राच्या शीतल छायेत चांदणं काळोख रात्रीत आकाशात चमकत असत.
तो मावळताना मला पाहत होता,
जसा उगवताना नेहमीची च साथ देत होता.
६-६ महिने दूर असा त्याला ही मला एकट सोडवत नव्हता.
म्हणून की काय माहित घरी जरी गेलो तरी माझ्या सोबत येत होता. .
कसा प्रवास करत असावा …
हा सूर्य…कुठे राहत असावा…
कधी सह्याद्रीच्या कुशीत दिवसभर काम करून निद्रिस्त होतो.
तर कधी माझ्या सभोवताली वसलेल्या अथांग समूद्राच्या शेवटच्या टोकाला शांत निवांत टेकला जातो.
तर कधी उंच डोंगर दऱ्या खोऱ्यातून निरोप घेतो.
जाताना सोनेरी रंग उधळत जातो.
पुऱ्या आसमंतात त्याचीच कलाकृती पसरलेली दिसते.
कुठे ढगा आड काही किरणं लपलेली असते
तर कुठे काही किरणं सागराच्या लाटा सोबत किनाऱ्याला येऊन थडकत असताना भासते.
तो मावळताना मला पाहत होता,
मी तर रोजच त्याला पाहतो…
असेच आम्ही एक मेकांचे सोबती ….
तो मला समजून घेतो ,
अन् मला तो समजून घेतो.
कुणीहीआप्तेष्ट जवळ नसताना
काळजी घे मी पुन्हा उद्या येईन हळूच बोलून जात होता.
मी ही त्याला हसत हसत निरोप घेतला होता.
तो मावळताना मला पाहत होता,
तो मावळताना मला पाहत होता,…..
त्यांच्या आयुष्यात
असे अनेक दिवस येत असतात वर्षाच्या ३ ही ऋतुंचा हात पकडून या सागरी जीवांना सागरी किनाऱ्यावर वास्तव्य करायच असत. रोजच्या काम काजाला जोमाने सुरुवात करायची असते. अश्यावेळी वेळी जहाजांवर प्रवास करताना आपल्या जीवा वरचा धोका हि टाळायचा असतो. काही काही महिने कुटुंबासोबत संपर्क सुद्धा होत नसतो. तरीही त्यांच्या जगण्यातील वेगळे पण ते जपतात आणि जगतातही. तेंव्हा एकच वाक्य म्हणावंस वाटते.
“स्याल्लूट टू सिफेरर्स”
माझे मित्र नेव्ही मध्ये कार्यरत आहेत. तुमचे हि नातेवाईक किंव्हा मित्र परिवार इथे कार्यरत असतील .
त्यांच्या अडचणीच्या वेळी तुम्ही तिथे हजर नाही होऊ शकत, पण किमान त्यांच्या नेहमी संपर्कात राहा .
नेटवर्क नसेल तरीही मेसेज टाकून ठेऊ शकता त्यांची काळजी घेऊ शकता. पूर्वी मोबाइल फोन इत्यादी नव्हते कि, काही तंत्रज्ञात इतके प्रगतशील नव्हते पण सध्या या गोष्टीचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. कधी कधी वाटलंच तर ओल्ड मेलडी , जुन्या आठवणी , गमती जमती त्यांना पाठवा , त्यांची काळजी घ्या. भौगोलिक स्वरूपातील मिलांचे अंतर कितीही असेल तरीही मनाचे अंतर जवळ आहे, आपल्या पासून ते दूर नाहीत याची जाणीव करून द्या. आणि त्यांच्या चेहऱ्या वरचा आनंद पहा . आनंद वाटल्याने द्विगुणित होतो.
तो सूर्यास्त पाहून या वेळी एक सुंदर संगीत आठवत आहे मला सर रफी यांचं …… ….
तू इस तरह से मेरी ज़िंदगी में शामिल है
जहाँ भी जाऊँ ये लगता है, तेरी महफ़िल है….
ये आसमान ये बादल ये रास्ते ये हवा..
हर एक चीज़ है अपनी जगह ठिकाने पे
कई दिनों से शिकायत नहीं ज़माने से
ये ज़िंदगी है सफ़र तू सफ़र कि मंज़िल है, जहाँ भी …
धन्यवाद
सौ. रुपाली शिंदे
भादवन ( आजरा )
मुख्यसंपादक