मी स्वप्नात आज रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते,
नकळत नजर वर आणि हात जमिनीला टेकले होते,
स्वराज्याच्या शांततेचे सुंदर गीत कानी पडले होते,
ते अंधारच जणू मधुर संगीत गात होते
गडाच्या पायथ्याशी जणू युद्धाचे अवघे रणांगण उभे राहिले होते,
राज्याच्या त्या पाऊलखुणानी मी धन्य धन्य जाहले होते,
मी स्वप्नात आज रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते,
माझे, राजे पालखीत विराजमान झाले होते
सगळेच मावळे घोड्यावर स्वार होऊन राजांच्या मागे धावत होते,
तो राजमहाल, तो तोफखाना, ती सदर, तो राजवाडा
सगळेच स्वागतासाठी सज्ज होते,
जय भवानी जय शिवाजी आवाज माझ्या कानात घुमत होते,
मी स्वप्नात आज रायगडच्या पायथ्याशी पोहोचले होते,
आई भवानीच्या मुखावर प्रचंड तेज दिसत होते,
दिव्यांनी आज अखण्ड रायगड प्रकाशित झाले होते,
विजयाचे भगवे रायगडावर चढवले जात होते,
तो नयनरम्य देखावा मी माझ्या हृदयात साठवून घेत होते,
दगड न दगड जणू विजयाचे पोवाडे गात होते,
मी स्वप्नात आज रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते,
स्वराज्य, प्रेम, एकनिष्ठा, मातृप्रेम, जनसेवा यांनी अवघा किल्ला नटला होता,
राजाच्या पावन स्पर्शाने पवित्र झाला होता,
विविध पराक्रमाचा साक्षीदार माझा गड भासत होता,
अंधाऱ्या कित्येक रात्री माझा राजा अन् रायगड जागाच होता,
सिंहासनावर राजा माझा विराजमान होता,
आणि मी त्यांच्या चरणापाशी नतमस्तक झाले होते,
मी स्वप्नात आज रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले होते…
नेहा नितीन संखे
( बोईसर )
समन्वयक – पालघर जिल्हा
नमस्कार 🙏
वाचताना आपसूकच अंगावर शहारा येत होता. का कुणास ठावूक पण शब्द रचना म्हणा नाहीतर त्या शब्दांतली लय, गेयता म्हणा. वाचताना मी रायगडाच्या कुठेतरी एका बाजूला टोकावर उभा आहे आणि हे शब्द उच्चारत आहे असा मलाच माझा भास होत होता.
तो पाहिलेला रायगड आणि त्याची भव्यता डोळ्यासमोर आली होती. एक वेगळाच अनुभव येत होता.
माझ्यासारख्या दुर्ग सेवक आणि शिवकार्य करणाऱ्या माणसाला असे वाचन करण्यास मिळाले की, पुन्हा पुन्हा वाचावे आणि त्याचे गीत गावे असेच होते.
सुंदर,
खूपच सुंदर…
सुप्रतिम…
🚩जय शिवराय🚩
खरच खूप छान लिहिलंय.वाचताना आपण स्वतः तिथे आहोत याची सुंदर जाणीव हे शब्द करून देतायत.तसे रायगडी भरपूर जाणे झाले आहे पण आजुन काय मन भरत नाही.कितीही मनसोक्त डोळे भरून पाहिले तरी परतीच्या वाटेवर नक्कीच काहीतरी राहिल्याची जाणीव होते.
सुरेख सर
धन्यवाद 🙏🙏
[…] स्वप्न – रायगडाच्या पायथ्याशी […]