Homeमुक्त- व्यासपीठ🚩शिवप्रताप🚩

🚩शिवप्रताप🚩

एका विराचा जन्म झाला
रक्ताच्या अभिषेकाने स्वराज्य रचला
तलवारीच्या धारेने इतिहास चमकवला
मराठ्यांचा मावळा कधी नाय खचला
म्हणून जुलमी सत्तांचा डाव फसला
माझा शिवराय भवानी रूपाने धावला
म्हणून म्हणतो इतिहासाचा नाद नाय करायचा,

एका योद्धाचा जन्म झाला
मराठा मुलुख वाढली
बडी बेगमला धास्ती भरली
अफजखानाला इशारत सोडली
उंच धिप्पाड अफजल धाऊन आला
‘मै लाऊंगा शिवा को,
सह्याद्रीच्या सिंहाला मारण्याचा कावा केला
राजाने कोथळाच रक्तबंबाळ केला
माझा शिवराय कृष्णाच्या रूपाने धावला
म्हणून म्हणतो इतिहासाचा नाद नाय करायचा,

एका शूरवीराचा जन्म झाला
महली शाहिस्थेखान शांत निद्रेत
पुणे उध्वस्त करून बसलेला
शिवरायांच्या गनिमीने बोटे गमावून बसला
शाहिस्थेखान थरथर कापला
पुणे सोडून हद्दपार झाला
माझा शिवराय रामाच्या रूपाने धावला
म्हणून म्हणतो इतिहासाचा नाद नाय करायचा,

एका राजाचा जन्म झाला
स्वराज्य घडी बसली
चनचन पैशांची सुरू झाली
सुरतेवर हल्ला करून
सुरत बेसुरत केली
इंग्रज डच पोर्तुगीज मुघल हादरली
माझा शिवराय दैवत रूपाने धावला
म्हणून म्हणतो इतिहासाचा नाद नाय करायचा,

एका सूर्याचा जन्म झाला
हो आमच्या शिवबाचा जन्म झाला
पिंजून काढली मोगलाई
भादरून काढली आदिलशाही
दिल्लीचा औरंगजेब थरथर कापला
माझा शिवराय विट्ठल रूपाने धावला
म्हणून म्हणतो इतिहासाचा नाद नाय करायचा

✍️ कवी :- स्वप्नील चंद्रकांत जांभळे.
जि. रत्नागिरी ता. दापोली हातीप.(मो.9619774656)

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. अप्रतिम कविता वाचताना घडलेले दृश्य समोर आले .
    महाराजांविषयी काय बोलावे , किती बोलावे , जेवढे बोलावे तितके कमीच . शब्द कमी पडतील पण आपल्या महाराजाचे कौतुक कधीच कमी होणार नाही
    धन्यवाद सर या कवितेसाठी 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular