नक्की कोण बिघडलाय…
निसर्ग की माणूस…? स्नेहा राणे.
माणसाचं अस्तित्व स्वतंत्र नाही तर निसर्गातील सर्वांशी त्याची नाळ जोडलेली आहे,हे त्याने आता तरी जाणावे.आज पर्यावरण संतुलन ढासळलं म्हणून किंवा तापमान वाढ झाली
म्हणून चोवीस तास पंखे फिरवून
थंड पेये पिवून किंवा ‘एसी’त झोपून हे पर्यावरणाचे प्रश्न सुटणार आहेत का? म्हणून म्हणते,ही विनाशाकडे चाललेली
वाटचाल थांबवून आता तरी आपण पर्यावरण रक्षणाच्या वारीत सामील व्हायला हवे.
अतिलोभापायी झाडांची प्रचंड प्रमाणात होणारी कत्तल आता थांबवलीच पाहिजे माणसाने.नाहीतर पर्यावरण र्हास
होणारच.म्हणून म्हणते,”विकास साधतांना ठेवू पर्यावरणाचे भान”
दोघांनाही राखताना देवू समतोलाला स्थान”. खरंतर,या
बदलत्या पर्यावरणाच्या परिस्थिती ला माणसांची बदलत चाललेली जिवनशैलीच तसेच त्यांच्या प्रचंड
हव्यासापोटी होत असलेली नैसर्गिक नासाडी या गोष्टीच कारणीभूत आहेत.संत साहित्यातील पर्यावरण विचारांवर
चिंतन करणे आज महत्वाचे ठरते.
“चला लावू झाडे,ठेवू निसर्गाचे भान.पाऊस गाईल जीवनगाणे,
भागेल सार्यांचीच तहान”
निसर्गातील प्रत्येक जण आपले आपण भरण-पोषण करत असतो .
झाडे सुध्दा स्वतःचे अन्न तयार करतात.माणूस फक्त त्याच्या फळा-फुलांचा आस्वाद घेतो.दुसरे
असे की निसर्गात सगळीकडे आपल्याला “समतोल” दिसतो.कशाचाही अतिरेक नाही.
“चोचीत मावेल इतकाच दाणा टिपतात पाखरं”. माणसं मात्रं अति खातांना दिसतात.अतिलोभापाई माणूस निसर्गाच्या विरुद्ध जात आहे.त्याचा नाश करत आहे, त्यामुळेच निसर्गात प्रचंड उलथापालथ होतेय.
हवामान बदल किंवा पर्यावरणासारख्या महत्वाच्या प्रश्नांकडे विविध संघटनांनी तसेच सोशल मिडियाने सजगपणे पहायला हवे,हे जितके खरे आहे, तितकेच सर्वसामान्य नागरिकांनी
ही या प्रश्नाकडे गांभीर्याने पहाणे
आवश्यक आहे.
आज माणसाची संवेदना अशी असावी की सहवासातले प्राणी, पक्षी, वनस्पती यांनाही “अभय”
द्यावे.माणसातील वैयक्तिक स्पर्धा
प्रगतीचा अतिरेक सोडून पक्षांसारखे आटोपशीर जगू या.पर्यावरण संतुलन माणसाने राखले तर प्रदूषण होणारच नाही.
वेळेत पुरेसा पाऊस पडेल.त्यामुळे दुष्काळी परिस्थिती
उद्भवणार नाही व आत्महत्या करण्याची पाळीही कोणावर येणार नाही.नैसर्गिकता संपली कि प्रदूषण निर्माण होते.म्हणूनच
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”
असे तुकारामांनी सांगितले,तर
“काक विष्ठा करिती,तेथे पिंपळ होती”असे संत नामदेवांनी सांगितले आहे.५ जून १९७२ ला
पर्यावरण दिनाची सुरूवात झाली
आणि जगभरात या दिवशी पर्यावरण, वन्यजीव,जंगलसंवर्धन
विषयक जनजागृती व्हावी असे
ठरवण्यात आले.लाखो झाडे लावण्यापेक्षा शेकडो झाडे जगवणे महत्वाचे आहे.पक्षी एका
झाडाच्या बिया दुसरीकडे टाकण्याचे काम करत असतात,मात्र ते कधी त्याचा सेल्फी काढत बसत नाही,आपण
मात्र झाडे लावल्यानंतर सेल्फी काढून झाला कि परत त्याकडे बघत नाही.मात्र काहीजण त्या झाडांना नियमित पाणी देवून जीवंत ठेवण्याचे कामही करतात
भारताच्या तीन बाजूंनी सागर, आणि उत्तरेकडे हिमालय पर्वत.त्यामुळे तापमानात होणारी वाढ तुलनेने अजूनही सहन करता
येते.असेच जर तापमान वाढत गेले तर माणसाला जगताही येणार नाही.शेवटी,”तापमानाचा”
विचार गांभीर्याने केला नाही तर
माणसाच्या अस्तित्वाचे काही खरे नाही.
या अश्याच विविध प्रकारच्या खाजगी व सरकारी नोकरीच्या जाहिराती सर्वप्रथम पाहण्यासाठी खालील फेसबुक ग्रुप मध्ये सामील व्हावे.
https://www.facebook.com/groups/2574733692753005/?ref=share
- लेखिका-स्नेहा राणे/बेहेरे, ठाणे, वेंगुर्ला.
मुख्यसंपादक