Homeमुक्त- व्यासपीठप्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

संविधानाच्या गौरवाचा,दिन प्रजासत्ताकाचा.
राज्यघटनाकार बाबासाहेबांच्या लेखणीचा .१

स्वातंत्र्य,समता,बंधुत्व आणि व्यक्तीविकासाचा,
परिपूर्ण विचार केला कल्याणकारी राज्याचा .२

धर्म,जाती ,पंथ,भाषा आणि भिंन्न प्रदेशांचा ,
विचार केला विविधतेतील एकात्म भारताचा.३

सामांन्यांशी केंद्र मानूनी मार्गदर्शक तत्वांचा,
भारतीयांच्या मुलभूत हक्क व कर्तव्यांचा.४

धर्मनिरपेक्ष ,समाजवादी व गणतंत्र राज्याचा ,
पाया रचला भक्कम संसदीय लोकशाहीचा .५

तिरंगी राष्ट्र निशाण देई संदेश नित्य देशप्रेमाचा ,
अशोक चक्र सांगे वारसा सम्राट अशोकांचा .६

७४ वर्षे प्रजासत्ताकाची अद्भूत‌ ऐशा प्रगतीची ,
नतमस्तक होवूनी थोरवी गाऊ, भारतमातेची . ७

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनी माझी काव्यपुष्पमाला भारतमातेच्या चरणी समर्पित करीत आहे .
जयहिंद

           कवी श्री रेवाशंकर वाघ ठाणे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular