बैलपोळा

बळीराजाच्या प्रेमाचा ,
सण अपुला बैलपोळ्याचा .
नंदी वाहन महादेवाचा ,
सण बैलाशी पुजण्याचा .१

वर्षभर राबतसे शेतामधूनी,
सामान वाहतसे बैलगाडीतूनी.
पावसाच्या पाण्यातूनी ,
उन्हाच्या तप्त झळांनी .२

कधी खाई फटके आसूडाचे ,
कधी अंगावर फिरे हात प्रेमाचे .
काम चोख ढवळ्या पवळ्याचे.
बळीराजाच्या कल्याणाचे .३

कष्ट करणाऱ्या बैलराजाचा,
दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा .
दिवस आजचा पोळ्याचा,
नैवेद्य गोड पुरणपोळीचा ,४

कवी श्री रेवाशंकर वाघ ठाणे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular