Homeवैशिष्ट्येभाग ३६ - स्थानिक निधी संकलानासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे

भाग ३६ – स्थानिक निधी संकलानासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे

भाग ३६
स्थानिक निधीसंकलानासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे

निधी संकलनासाठी प्रभावी संवाद कौशल्य हवेच !!
संस्थेच्या कामासाठी निधी संकलन करत असताना गोळा करताना, संसाधनाची जमवाजमव करताना आपल्या सर्व प्रकारच्या संवादातून आपण मदत मागायला हवी आणि प्रत्येक संबंधित व उपलब्ध संवादातून सतत आभार मानायला हवेत.
आपला संवाद पाहणाऱ्याची नजर खिळवून देणारा हृदयाला स्पर्श करणारा आणि विचारांना चालना देणारा धूसळवणारा हवा. निधीसंकालनासाठीच्या संवादाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला ३ गोष्टींची स्पष्टता हवी;
आपल्या संस्थेच्या कामाबाबत आणि त्या सामाजिक प्रश्नाबाबत.
आपल्या संस्थेचं काम लोकांना काम महत्त्वाच वाटतं? व ह्या कामास मदत होते का महत्त्वाचे आहे. आर्थिक मदतीच्या गरजेबाबत स्पष्टता आणि मिळणाऱ्या निधीच्या परिणामाबाबत देखील.

यासाठीचा संवाद प्रभावी करण्यासाठी काही तत्त्व पाळता येतील :
काय आणि का या दोन्हीमधला फरक समजून घेऊन त्या अनुषंगाने आपले सादरीकरण/मांडणी असायला हवी आपली Case तयार करणे. ज्यातून वस्तुस्थिती आणि त्यामागची कारणमीमासा दोन्ही स्पष्ट होईल.
शक्य असल्यास आपल्या संवादात सत्यघटनाचा थोडे यात समावेश करता येईल. ज्यामुळे ज्या प्रश्नावर आपण काम करतोय त्यातील जीवंतपणा वास्तवात त्या कामाची गरज जास्त प्रकर्षाने देणगीदारांसमोर मांडता येईल.

प्रभावी संवादासाठी काही टिप्स :
▶️ संस्थेचे VISION MISSION व अनुषंगाने संस्थेचे काम सतत अधोरेखित करा.
▶️ देणगीदारांशी संवाद साधताना बोजड शब्दांचा (क्षरीसेप) उपयोग टाळा.
▶️ चित्र, आलेख यांचा योग्य वापर चांगला प्रभाव पाडू शकेल.
▶️ महत्त्वाच्या व्यक्तीची पत्र, त्यांनी आपल्या संस्थेविषयी व्यक्त केलेले मत इत्यादींची चांगली छाप पडू शकेल.
▶️ आकर्षक म्हण, सुविचार, एखादा संदेश आणि संस्थेचा लोगो यांचा देखील चांगला प्रभाव पडतो.
▶️ प्रसारमाध्यमांशी चांगला संपर्क ठेवणे, वृत्तसंकलक, रिपोर्टर यांच्याशी असलेल्या ओळखीचा निश्चितच उपयोग होतो.
लोकांच्या भावनांना हात घालणे जास्त महत्त्वाच, बरेच लोक विचार करून देण्यापेक्षा भावनावश होऊन देणगी देतात.
स्वयंसेवी संस्था म्हणून काम करत असताना आपण खालील कारणासाठी संवाद साधतो.

       Get Something
     (काही मिळवण्यासाठी)   
                  ⏬
      Learn Something 
          (शिकण्यासाठी)
                  ⏬
   Establish Relationships 
      (सुसंबद्ध वाढवण्यासाठी)
                  ⏬
             Discover 
           (शोधण्यासाठी)
                  ⏬
            Influence
     (प्रभाव पाडण्यासाठी) 
                  ⏬
              Inform 
       (प्रभाव पाडण्यासाठी)
                  ⏬
              Persuade 
            (पटवण्यासाठी)
                  ⏬
          Express a Need 
          (गरज सांगण्यासाठी)
                  ⏬
      Reduce Uncertainty 
     (अस्थिरता कमी करण्यासाठी)
                  ⏬ 
              Explain 
     (समजून सांगण्यासाठी)
                  ⏬
           Make Clear
      (जास्त सुस्पष्ट करण्यासाठी)

प्रभावी संवादातील महत्त्वाचे घटक
Credibility – विश्वासाहिता,

Content- काय सांगायचे आहे:

Channel – माध्यम काय आहे?

संवाद साधण्यासाठी विविध माध्यम :
▶️प्रत्यक्ष भेट घेणे
▶️माहिती किती आहे
▶️लोकांपर्यंत कसे पोचता
▶️जनमान्यता किती आहे
▶️माहिती पुस्तिका
▶️वार्षिक अहवाल
▶️Visiting Cards
▶️दूरध्वनी / इमेल/ वेबसाईट द्वारे साधलेले संवाद
▶️Powerpoint Presentation
▶️पत्र
▶️Posters/Banners/Hoardings/Fliers
▶️वार्तापत्र
▶️वृतपत्र, मासिक, रेडीओ, टीव्ही
▶️E-mail, Website
▶️शुभेच्या कार्ड
▶️प्रदर्शन
▶️जाहीर आवाहन
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular