Homeकृषीभेंडी लागवड

भेंडी लागवड

सुधारित वाण : फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका, अर्का अभय
पेरणीची वेळ : खरीप – जुलैचा पहिला आठवडा, उन्हाळी – जानेवारीचा तिसरा

आठवडा

बियाण्याचे प्रमाण : १२ -१५ किलो प्रति हेक्टर.
लागवडीचे अंतर : ३० x १५ सें. मी.
खतांची मात्रा : २० टन शेणखत, १००:५०:५० किलो नत्रःस्फुरदःपालाश प्रति

हेक्टरी

आंतरमशागत : अ) १५ ते २० दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी करणे.
ब) लागवडीपासून एक महिन्यांनी वर खताच्या मात्रा
द्याव्यात.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
अ) सेंद्रिय खते : २० टन शेणखत किंवा ७.५ टन गांडूळखत प्रति हेक्टर द्यावे.
क) जिवाणू खते : अॅझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जिवाणू २५ ग्रॅम प्रति १

किलो बियाण्यास चोळावे.

खते देण्याची वेळ : 1. सेंद्रिय खते पुनर्लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावेत.

  1. रासायनिक खते : १००:५०:५० नत्र, स्फुरद व पालाश
    कि./हे. रासायनिक खते ५०:५०:५० टक्के नत्र, संपूर्ण
    स्फुरद व पालाश प्रति हे. पेरणीच्यावेळी द्यावे व उर्वरित
    ५० कि. नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे.
  2. जिवाणू खते बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.
    आंतरमशागत : १५-२० दिवसाच्या अंतराने नियमीत खुरपणी करावी.
    पीक संरक्षण
    रस शोषणारी कीड : इमिडॅक्लोप्रीड ४ मि.ली. किंवा थायामेथोक्झाम ४ ग्रॅम किंवा

मिथाईल डिमेटॉन १० मि.ली. प्रति १० लि.पाण्यासाठी.

फळे पोखरणारी : किडकी फळे मातीत पुरावीत. एन्डोसल्फान २० मि. ली. प्रति

24

अळी १० लिटर पाणी किंवा डेल्टामेथ्रीन ५ मिली, प्रोफे नॉफॉस १
मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ३ मि.ली.प्रति १० लिटर
पाणी या प्रमाणात फवारणी करावी किंवा ४ टक्के निंबोळी
अर्काची फवारणी करावी. ट्रायक्रोकार्ड १०/ हे. वापरावे.

भुरी रोग : पाण्यात मिसळणारे गंधक ०.२५ टक्के किंवा डिनोकॅप ०.१
टक्के यांची फवारणी रोगाची लक्षणे दिसताच १५ दिवसांच्या
अंतराने करावी.

पानावरील ठिपके : मॅन्कोझेब ०.२५ टक्के किंवा कार्बेन्डॅझिम ०.१० टक्के यांची
फवारणी १०-१५ दिवसांच्या अंतराने रोगाची लक्षणे दिसताच
सुरू करावी.

उत्पादन : १५-२० टन प्रति हेक्टर

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular