Homeघडामोडीमुश्रीफ साहेब आमच्यावर रागावला की काय - भादवण मतदार

मुश्रीफ साहेब आमच्यावर रागावला की काय – भादवण मतदार

भादवण – ( अमित गुरव) – कागल मतदारसंघातून सलग सहावेळा त्यापैकी उत्तुर मतदारसंघ जोडल्यावर ४ वेळा आमदार झालेले श्री. हसन मुश्रीफ यांनी श्री. समरजित घाटगे यांच्यावर दणदणीत विजय मिळवला . गत पंचवार्षिक मध्ये भादवण तसेच उत्तूर मतदारसंघातून मताध्यक्य मिळवले , पण त्या मानाने या वेळी त्यांना उत्तूर् मधून तितकेसे यश संपादन करता आले नाही. त्यांचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदार संघ श्री. घाटगे यांनी फोडण्यात त्यांना चांगलेच यश मिळाले. त्याबद्दल श्री. घाटगे यांनी उत्तुर मतदारसंघाचे जाहीर आभार व्यक्त केले .
श्री . मुश्रीफ यांनी निवडून दिलेल्या सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींना आभार व्यक्त करण्यासाठी एक बॅनर पण लावला नाही मात्र पराजित उमेदवार श्री. घाटगे यांचा बॅनर मात्र लागला त्यामूळे मुश्रीफ साहेब आमच्यावर रागावला की काय ? असा प्रश्न भादवण च्या मतदारांना पडला आहे.

चौकट -: विद्यमानन आमदार श्री. हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, शिवाजी पाटील यांचे लिंक मराठी वतीने हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा..

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular