Homeमुक्त- व्यासपीठमनात आलं सहज

मनात आलं सहज

मस्तपैकी हिंडावं
घ्यावी गगनभरारी
चंद्राला भेटावं
जावं चांदणीच्या घरी.

मनात आलं सहज
करावी समुद्रसफर
लाटांशी खेळावं
बांधव तिथच घर .

जावे फुलांच्या बागेत
फुलासंगे डोलावं
फुलपाखरांशी खेळावं
आनंदाने नाचावं.

निसर्गाच्या सानिध्यात
पक्ष्यांशी बोलावं
प्रेमाची भाषा शिकावी
झाडांवर चढावं.

मित्र असावे संगती
दंगा मस्ती धमाल
सारे बघतील मग
आमचीच कमाल.

  • कवी- किसन आटोळे
    ( वाहिरा ता.आष्टी )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular