Homeमुक्त- व्यासपीठएक तर मैत्रीण असावी!

एक तर मैत्रीण असावी!

एक तर मैत्रीण असावी खंबीरपणे पाठी उभं राहणारी
दुःखाला ही तटवत हसून आल्यापावली मागं धाडणारी
सुमधुर हास्याने आपल्या जगण्याला बळ देणारी
कंबर कसून सज्ज होण्याचा नवखा पाठ शिकवणारी
होय एक तर मैत्रीण असावी तुमच्याकडे बोट करावं अशी असणारी………………।1।
सदा प्रसन्न चेहऱ्यामधून वेगळं काहीसं सांगणारी
विचारावं काहीसं खळबणारं संदेश हलकेच वाचणारी
गारठून बसलेल्या लेखणीला शब्दांचं बळ देणारी
प्रसंगी स्मरणाने सोनेरी मैत्रीला जागं करणारी
होय एक तर मैत्रीण असावी तुमच्याकडे बोट करावं अशी असणारी………………।2।
कोण काही म्हणतो तेव्हा झुरणीचा जीव आधारणारी
मनाची कासावीस धापताना विचार पेरणी करणारी
धडपडत अवसान गाळताना योग्य दिशा दावणारी
अंत घटकेस ही साद घालता मित्राला टेकू देणारी
होय एक तर मैत्रीण असावी तुमच्याकडे बोट करावं अशी असणारी………………।3।
मैत्री म्हणजे दिव्य प्रकाश त्यास तेजस्विता देणारी
खुलत्या जीवनास मित्राच्या तोषाने खुलवणारी
जिथं तिथं चुकताना मैत्री बंधनाने पाऊले वळवणारी
कोण तरी विचारणा करणार याची मशाल जिवंत ठेवणारी
होय एक तर मैत्रीण असावी तुमच्याकडे बोट करावं अशी असणारी………………।4।
खरे असावी मैत्रीण सुखदुःख सांगावं वाटणारी
धायमोकलून रडणाऱ्या हृदया आधार खांदा देणारी
भार्याशी कलह होताना तडजोड राह सांगणारी
मित्राचं सुख आपलंचं आहे यास फाटा न देणारी
होय एक तर मैत्रीण असावी तुमच्याकडे बोट करावं अशी असणारी………………।5।

  • श्री.कृष्णा शिलवंत
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular