Homeमुक्त- व्यासपीठरक्षकच जेव्हा भक्षक होतो

रक्षकच जेव्हा भक्षक होतो

           स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात  प्राणप्रिय व्यक्ती म्हणजे तिचा जन्मदाता बाप..... शक्यतो आईपेक्षाही मुलींचा बापावर जास्त जीव असतो....आणि बापाचाही आपल्या मुलांपेक्षा मुलीवर जास्त जीव असतो..... आपली मुलगी उदया दुसऱ्यांच्या घरी जाणार म्हणून बाप तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार असतो.... तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो.... चांगलं शिक्षण देतो.... आपल्या पायावर उभं करतो... जगात वावरताना जगाशी चार हात कसे करायचं याचं व्यावहारिक ज्ञान शिकवतो.....तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या पंखात बळ देतो..... बहुतेक मुलींसाठी तिचा बाबाच आदर्श असतो तर बऱ्याच जनींना वाटतं की आपला भावी जोडीदार आपल्या बाबांसारखा असावा....असाच काहीसा बहुतेक मुलींचा आपल्या बापा विषयीं अनुभव असेल....

बहुतेक मुलींचा एवढ्यासाठी म्हणते कारण सगळ्याच मुलींच्या आयुष्यात असा बाबा असतोच असं नाही…. काहींसाठी अभिशाप देखील असतो…..

               प्राजक्ता,तेरा चौदा वर्षाची कोवळी पोर....गोरीपान, देखणी, नाकीडॊळे सुरेख.... हुशार, चंचल.... नुकतीच वयात यायला लागली होती.... आणि तिच्याच जन्मदात्या बापाची वाकडी नजर तिच्यावर पडली.... रोज रात्री सगळे झोपल्यावर हा नाराधम तिच्या  अंथरुणात जाऊ लागला, आणि नको ते चाळे करू लागला.... बिचारी कवळी पोर अवघी हदरून गेली..... कुणाला सांगावं, कुणाशी बोलावं, काही काही कळेना....स्वतःच्याच बापाची तिला भीती वाटू लागली.... तिच्या मनात बापाविषयी तिरस्कार निर्माण झाला.... किळस वाटू लागली त्याची.... बाबा म्हणून हाक मारावी वाटेना..... येणारी प्रत्येक रात्र तिच्या साठी कळरात्र असायची..... रात्रीचा जणू तिने धसकाच घेतला होता.... पायापासून केसापर्यंत स्वतःला चादरीत गुंडाळून घायची....जीव गुदमरून गुदमरून जायचा, पण ती त्या चादरीतून बाहेर निघत नसं....डोळे बंद करून फक्त सकाळ होण्याची वाट बघायची....

                हळूहळू डिप्रेशन मध्ये जाऊ लागली..... आत्महत्या करावी वाटली पण जीव द्यायची तिची हिम्मत झाली नाही.....हस्तींखेळती पोर बापाच्या विकृतीला बळी पडली..... मनातल्या मनात झुरु लागली..... आपलाच बाप आपल्याशी असं कसं वागू शकतो तिला कळना..... आजूबाजूच्या मुलींना जेव्हा ती त्यांच्या बाबांविषयी आदराने बोलताना बघायची तेव्हा तिची मान शरमेन खाली जायची.... आगआग व्हयची तिच्या देहाची..... रक्त उसळायचं.....पण काहिही करू शकत नव्हती.... हतबल होती..... कुणाला जर हा प्रकार सांगितला तर कोण आपल्यावर विश्वास करेल.... सगळे आपल्यालाच दोशी ठरवतील..... आपल्यावर हसतील.... टिंगलटवाळी करतील...आपल्या घराची अब्रू जाईल म्हणून सगळं गप मूग गिळून सहन करत होती......

               दिवसामागून दिवस जात होते.... तिची मनस्तिथी बिगडू लागली.... बारावीला गेली तेव्हा तिच्या आजोबांनी तिच्यासाठी मागणं आणलं..... शिकायची इच्छा असताना देखील तिला लग्न करून नवऱ्याच्या घरी जान जास्त सुरक्षित वाटलं.... कमीत कमी ह्या रोजच्या मरण्यात्नातून तर सुटेल..... असा विचार करून तिने लग्नाला होकार दिला......

              ज्या घरात मुलगी सगळ्यात जास्त स्वतःला सुरक्षित समजत असते, त्याच घरात जर असुरक्षित असेल तर तक्रार तरी कोणाकडे करायची..... अश्या अनेक प्राजक्ता ह्या जगात आहे ज्या कधी आपल्याच रक्तामासाच्या माणसांच्या विकृतीला बळी पडतात तर कधी समाजाच्या..... आजची स्त्री घरीदारी कुठही सुरक्षित नाही......स्त्रीचा जन्मच म्हणजे शाप....असं मला वाटतं.....
         
- सुनीता खेनगले

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular