दारूड्याच्या पत्नीची व्यथा मी या रचनेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे
रातरीला सजन माझा
होऊन आला बाई बंग
होऊन त्याच्याशी धुंद
बाई झाले ग मी दंग
केलता ग साजशृंगार
नटले मी त्याच्यासाठी
झुलत पडत ग आला
पाठी बसवीली काठी
तरू कशी ग मरू कशी
नांदू कशी ग त्याच्या संग!!१!!
पिदाड्या ग तो पिऊन
आला बाई दारू
ताटावरले उठवले मला
मनात ग पारू पारू
खायची म्हने कोंबडी
नाही दमडी सदा असतो या तंग!!२!!
मर्जीण त्याच्या जागविली
रात भोगून केली मनमानी
कमवीतो पट उडवीतो
दुप्पट लय प्रिय आंबट पाणी
ओढून साडी फाडुन
चोळी उघडे केले सारे अंग!!३!!
भरली जवानी ग माझी
दारू संग आंबट झाली
कुण्या जन्माची पुण्याई
ह्यांच्या संगे कामी आली
वास मारीते तोंड तरी
जवळ घेण्या करीतो रांग!!४!!
सांगते ऐका हे एक दिसाचं
नाही आहे रोजचं गार्हान
त्याच्यासाठी झिजते झूलते
तोच माझा प्रिय प्राण
नाकारु कशी ग त्यांच्या
मुळेच या जिंदगाणीला रंग!!५!!
जगन्नाथ काकडे
मुख्यसंपादक