भगवान, परमात्मा किंवा ईश्वर या तीन्हींचाही अर्थक एकच. पण शास्त्रांमध्ये देवी देवतांची अनेक रूपे सांगण्यात आली आहेत. हिंदू धर्मानुसार ३३ कोटी देवी-देवता मानल्या जातात. प्राचीन काळापासून भारतामध्ये असंख्य देव-देवतांना पूजले जाते. याविषयी अनेकांच्या मनात नेहमी प्रश्न असतो की खरोखरच ३३ कोटी देवी देवता असतील का ?
वेद-पुरांणांमध्ये ३३ ‘कोटि’ देवी – देवता असल्याचे म्हटले आहे. येथे कोटी हा शब्द विशेषणात्मक आहे संख्यावाचक नव्हे. कोटी म्हणजे भरपूर. येथे असलेला ‘कोटी’ हा शब्द करोड या अर्थाने घेण्यात येऊ लागला. त्यामुळे असे मानले जाऊ लागले की हिंदूंमध्ये ३३ कोटी देवी देवता आहेत. वास्तवात ३३ ‘कोटी’ देवी देवता आहेत.
33 कोटी मध्ये –
८ वसु –
आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष, प्रभाष यांचा समावेश आहे.
११ रुद्र –
मनु, मन्यु, शिव, महत, ऋतुध्वज, महिनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत ध्वज.
१२ आदित्य –
शुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धातु, पर्जन्य, पूषा, भग, मित्र, वरुण, वैवस्वत आणि विष्णू.
इंद्र आणि प्रजापती यांचा समावेश आहे.
काही लोकांच्या म्हणण्यानुसार इंद्र आणि प्रजापती यांच्या जागी दोन अश्विनीकुमारांचा समावेश केला जातो.
ईश्वर हा एक आहे आणि तो वेगवेगळ्या रूपांतून व्यक्त होतो. हा हिंदू धर्मांतील एक मूलभूत सिद्धांत आहे. विविध गुण आणि स्वभावांच्या लोकांसाठी अनेक देवतांची रूपे आहेत. त्यामुळे देवतांची संख्या ३३ कोटी माणण्यात आली तरी त्यात तात्विक दृष्ट्या चुकीचे असे काहीच नाही. ईश्वर अनंत आहे. तो अनंत रूपांतून व्यक्त होतो, असा विशाल भाव हिंदू धर्मातून मांडण्यात आल्यामुळे 33 कोटी देवता आहेत अथवा नाहीत हा भाग गौण ठरतो.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
आपल्याला या विषयी आणखीन काही माहिती असेल तर आम्हाला कळवावी आम्ही ती योग्य शहानिशा करून update करू.
मुख्यसंपादक