आजरा ( अमित गुरव ) : पुणे जिल्ह्यातील नरसापुर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथे तरुणीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पंचायत समिती आजरा यांच्या उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात संबंधित आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली असून, अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे नमूद केले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


मुख्यसंपादक


