मारावी फुंकर / तुम्ही हळुवार/
उतरेल भार / या जीवाचा //१//
झाली बघा दैना / दुःखाचा डोंगर /
कोरोना कहर / किती सांगू //२//
धो धो कोसळला / आला महापूर /
नष्ट घरदार / मेले किती //३//
जन्म मनुष्याचा / संकट हे फार /
प्रेमाची फुंकर / तारी जीवा //४//
एकदाच जन्म / नको हेवादेवा /
आधार तो द्यावा / एकमेका //५//
धावूनिया जावे / फुंकर घालावी /
मदत करावी / ऐपतीने //६//
माणुसकी जपा / कृष्णा विनवितो /
फुंकर मारीतो / गोड शब्दे //७//
कवी – किसन आटोळे सर
वाहिरा ता.आष्टी, बीड
मुख्यसंपादक