Home Blog Page 12
आजरा(हसन तकीलदार):-शहरात गेली पाच वर्षे आजरा गांधीनगर येथे क्रीडा संकुलाचे काम सुरु आहे. येथील क्रीडा संकुल खेळाडूंसाठी अद्याप खुले केले गेलेले नाही. त्यामुळे सदर क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुले करावे व पाच कोटी रुपये खर्चून काम सुरु असणाऱ्या मैदानातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी करीत निदर्शने करण्याचा इशारा देत याबाबतचे निवेदन आजरा पोलीस ठाणे येथे शिवसेना उबाठाने दिले आहे. ...
आजरा(हसन तकीलदार):-विविध सामाजिक प्रश्न घेऊन लढा देणारी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वाखाली हैदरनगर,आजरा येथे पाणीपुरवठा सुरळीत करावा, पाणी पुरवठ्यातील तांत्रिक दोषांचा तातडीने शोध घेऊन आवश्यक त्या सुधारणा करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी करणारे निवेदन हैदर नगर येथील रहिवाश्यानी आजरा नगर पंचायतीला दिले आहे. ...
आजरा(हसन तकीलदार):-मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वराज्य सेनेने 16 ठिकाणी बासरी या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक इ. महानगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी कोर कमिटी, पदाधिकारी व कार्यकर्त्यानी निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. श्रीहरी बागल यांनी दिली आहे. ...
आजरा ( हसन तकीलदार ) :-शनिवार दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी तहसीलदार कार्यालय, चंदगड येथे एक दिवसीय धरणे आंदोलन केले. शनिवार दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी मा प्रांताधिकारी कार्यालय, गडहिंग्लज येथे जिल्हा स्तरीय एक दिवसीय धरणे आंदोलन केले. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने आंदोलने करून जात प्रमाणपत्रासाठी आपल्या विविध मागण्या बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मागण्यात आल्या. तरीसुद्धा यावर कोणतीही कार्यवाही न...
मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा ( आजरा )-: आजरा शहरासहसह संपूर्ण तालुक्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून आर्थिक दिलासा देण्यात यावा मागणी होत आहे. ...
आजरा(हसन तकीलदार):-तालुक्याचे नगदी पीक आणि पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजू पिकाचे उत्पादन आपल्या तालुक्यात उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. त्याला पूरक काजू बी प्रक्रिया व्यवसायिकांचे प्रकल्प प्रत्येक गावात सुरु आहेत. या प्रकल्पातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परंतु या व्यवसायातसुद्धा अनियमितता आणि अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी आपल्या विविध मगण्यांचे निवेदन पालकमंत्री व तहसीलदार यांना...
(हसन तकीलदार ):- अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बलिप्रथादिवशी बळीराजाला स्मरण करण्यासाठी सोयाबीन व इतर शेतकरी मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालय,तासगाव यांना निवेदन देण्यात आले.यावेळी कॉम्रेड उमेश देशमुख राज्याध्यक्ष अखिल भारतीय किसान सभा यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ व ताबडतोब मागण्यांची कार्यवाही व अंमलबजावणी झाली पाहिजे.कॉम्रेड संग्राम सावंत यांनी सांगितले की,सरकारने हमी भावाने सोयाबीन ५३२८ रुपये व कापुस ८१०० रुपये...
टोलनाका तालुक्याबाहेर नेणार-नामदार प्रकाश आबिटकर आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा 27व्या गळीत हंगाम शुभारंभाचे मोळी पूजन नाम. हसन मुश्रीफ यांचे हस्ते तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाम. प्रकाश आबिटकर यांनी भूषवीत वरूण राजाच्या साक्षीने कार्यक्रम पार पडला. पावसाची रिपरिप असल्याने कार्यक्रम मंडपात घेता आला नाही ऐनवेळी हा कार्यक्रम कारखान्याच्या बिल्डिंगमध्ये घ्यावा लागला.सर्वप्रथम काटा पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे संचालक...
आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीच्या सन 2025-30 या पंचवार्षिक निवडणूकीचे वारे सुरु झाले आहे. मतदार याद्या दुरुस्ती व हरकतीबाबतचे कामकाज युद्ध पातळीवर सुरु आहे. परंतु या मतदार यादीतील चुका या गंभीर, अनियमितता तसेच बोगस मतदार यांचा भरणा दिसून येत आहे. संभाव्य उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार मतदार आपापल्या वॉर्डात खोटे पुरावे सादर करून नोंदणी करून घेतल्याचे आरोप होताना दिसून येत आहेत. यासाठी योग्य...
आजरा ( प्रतिनिधी ) - दिपावलीच्या मंगलमय वातावरणात श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, हरपवडे विभाग (आजरा) तर्फे आनंद, ऐक्य आणि आपुलकीचा सुंदर क्षण अनुभवायला मिळाला. या प्रसंगी धनगर समाजातील बांधवांसाठी विशेष फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता — समाजातील एकोपा वाढवणे, परस्पर स्नेह वृद्धिंगत करणे,...