महिला बचत गटाचा उत्स्फूर्त प्रतिसद
आजरा (हसन तकीलदार):- महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर व भैरीदेव सेंद्रिय शेती शेतकरी गट ग्रामपंचायत आरदाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरदाळ, तालुका _आजरा येथे रानभाजी महोत्सव 2025 पार पडला. या कार्यक्रमांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला.यात महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.वेगवेगळे रानभाजीचे प्रकार प्रदर्शनात मांडण्यात आले होते. तसेच...
आजरा (हसन तकीलदार):-गोकुळ अष्टमी निमित्य आजऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वराज्य तालीम मंडळाचे संस्थापक अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांनी अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमासह भव्य दहीहंडीचे आयोजन केले होते. यांचे हे सोळावे वर्ष. बाळ केसरकर यांच्या या मानाच्या दहीहंडीचे मानकरी ठरले ते आजऱ्याची वाघाची तालीम.
बाळ केसरकर हे स्थानिक गोविंदाना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी भव्य दहहंडी स्पर्धेचे आयोजन करतात. भव्य दिव्य अशा मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबरच...
नांदेड / लातूर (तेजस्व अधिकारी) — उमरी (नांदेड) येथून रेणापुर (लातूर) येथे नियुक्त तहसीलदार प्रशांत थोरात यांनी पदाच्या गरिमेला अनुरूप न वागल्याच्या कारणास्तव निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. कारण? त्यांच्या निरोप समारंभाच्या दिवशी त्यांनी शासकीय खुर्चीवर बसून ‘तेरे जैसा यार कहाँ’ गाणे गायकले. हा व दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याने प्रशासनाची प्रतिमा धूमिल केली.
निलंबनाचे कारण:
विभागीय आयुक्त जितेंद्र...
इरलं घेऊन आलेल्या महिला शेतकरी ठरल्या आकर्षणाचा केंद्रबिंदूआजरा (हसन तकीलदार):-जनतेची मागणी नसताना, दळणवळणासाठी गरज नसताना राज्यातील 12जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी रयतेच्या राजासमोर शिवतीर्थावर बळीराजा एकवटला. धो धो संततधार पावसात भिजत महिला शेतकरी डोक्यावर इरलं घेऊन सहभागी झाल्या. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी पुष्प अर्पण...
घडामोडी
पश्चिम महाराष्ट्राला न्यायाचा नवा अध्याय – सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोल्हापूर सर्किट बेंच केले उद्घाटन
अमित गुरव
कोल्हापूर (प्रतिनिधी) :भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच इमारतीचे आज शाही समारंभात उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, राज्य...
आजरा (हसन तकीलदार):-पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा मध्ये गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव व राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.मनमोहक वेशभूषेने सर्वांना आकर्षित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी केले. गोकुळाष्टमी हा सण का साजरा केला जातो?त्याचे महत्त्व काय? भगवान श्रीकृष्णाची शिकवण याविषयी विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी सुरेश गुरव व अनिल कुंभार तसेच स्वामी...
आजरा(हसन तकीलदार)-सोमवार दि. 18ऑगस्ट 2025रोजी आजरा तहसील कार्यालयावर निघणारा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.हजारोच्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहही यावेळी करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई होते.गेले आठदहा दिवस वेगवेगळ्या गावात मोर्चाच्या तयारीसाठी झालेल्या बैठकांचा आढावा घेताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की, तालुक्यातील प्रस्तावित दाभिल, शेळप, पारपोली, खेडगे,...
आजरा (हसन तकीलदार):व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिवस विविध शालेय उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला..आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे हस्ते ध्वजारोहण त्याचबरोबर व्यंकटराव शिक्षण संकुलाच्या नवीन बोधचिन्ह फलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.. यावेळी संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या बोधचिन्हाच्या अर्थाचे विश्लेषण शिवाजी पारळे व पी. व्ही....
आजरा(हसन तकीलदार):-आजरा शाखा महावितरण तर्फे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेची त्याचबरोबर या अंतर्गत असणाऱ्या योजना व सबसिडीची माहिती जनतेपर्यंत पोहचावी यासाठी आजऱ्याच्या मुख्य रस्त्यावरून प्रचार व जागृती फेरी काढण्यात आली. विजग्राहकांना सौर ऊर्जेचे महत्व तसेच यामध्ये असलेल्या विविध योजनांची माहिती मिळावी हा या फेरीचा मुख्य उद्देश होता.सकाळच्या सत्रात महावीतरण कार्यालयापासून तहसील कार्यालय तसेच आजरा एस. टी. स्टॅंड येथे सौर वीज...
आजरा (हसन तकीलदार):-आज भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनी वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी कारखान्याचे सुरक्षा विभागामार्फत परेड संचलन करणेत आले.
या कार्यक्रमासाठी व्हाईस चेअरमन सुभाष देसाई, संचालक गोविंद पाटील, तज्ञ संचालक हाजी रशीद पठाण, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, चिफ अकौंटंट प्रकाश चव्हाण, मुख्य शेती...










