झुंज : भाग २३ -
बराच वेळ गेल्यावरही किल्लेदार काही बोलत नाही हे पाहून अब्दुल करीमच्या मनातील चलबिचल वाढू लागली. नेकनामखानामार्फत बादशाहने त्यालाही खिलत, पाचशेची मनसब तसेच दहा हजार नगद स्वरुपात देण्याची तयारी दाखवली होती. आणि हे साध्य होणार होते ते किल्लेदाराच्या एका निर्णयावर.
“आप और अच्छी तरह सोच लिजिए…” अब्दुल करीमचे शब्द किल्लेदाराच्या कानावर पडले आणि किल्लेदार भानावर आला.
“ठरलं…” किल्लेदार...
आम्ही टमाटे रस्त्यावर फेकून दिले,लाल चिखल नूसता, सूतळीचाखर्च ही निघेनामिर्च्याचा पार ठेचा झाला, कांदेचाळीतच सडले,अन् उसतारखे नंतर चार महीन्यानपाणी आटून अर्ध्या वजनातचनूसती साखर झाल्यावरकारखान्यात गेला. बर्याच जणांनीधूर्यावर टाकलातेंव्हा ही नाही यांची ब्रेकिंग न्यूज झाली
पेरणीच्या वेळी आम्हालाबियाणे विकत घेण्याच्याटायमाला नेमक्या ह्यांच्यागोडाऊन मधल्या स्वयाबिनणेउच्चांक गाठलातव्हा नाही झाली ह्यांची ब्रेकींग न्यूज
उसनवार्या,उधार्या दूकानदाराच्याखूशामत्या करूणबि बियाणे खते घालूण ,वाढवलतेच नेमकं अस्मानीण झोडपलंआर्ध पाण्यात बूडाल,...
यावर्षी खरीप हंगामामध्ये नगदी पीक म्हणून सोयाबीनला शेतकऱ्यांनी पसंती दिली आणि सोयाबीनचा पेरा वाढला त्याला कारणही तसेच होते खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमती पाहून गरीब शेतकऱ्याला वाटलं यावर्षी सोयाबीन पेरल तर सोयाबीनला चांगला दर राहील व आपल्याला उत्पादन खर्च जाऊन अपेक्षित नफा राहील म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची निवड केली त्यामध्ये सुरुवातीला चांगला पाऊस होऊन सोयाबीन पीक चांगल्या प्रकारे रुजून आलं मात्र...
संपादकीय
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवास आणि भविष्यातील झंझावात !
अमित गुरव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवास आणि भविष्यातील झंझावात!
(१) वयाची पासष्टी गाठली असताना मी जेंव्हा मागील काही राजकीय घडामोडी अभ्यासतो तेंव्हा मला त्या पार्श्वभूमीवर मा. राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हाच पक्ष महाराष्ट्रात नवनिर्माणाची क्रांती करेल असे वाटते. ते तसे का वाटते त्याबद्दलचा माझा हा लेख!
(२) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या नावात मधोमध असलेला नवनिर्माण...
झुंज : भाग २२ -
औरंगजेब बादशहा आपल्या आपल्या शामियान्यात बसला होता. शेजारीच तीन मौलवी कुराण आणि हदीसच्या प्रती घेऊन त्यात तोंड खुपसून बसले होते. बहुतेक कोणत्या तरी मोठ्या विषयावर बादशहाने त्यांचे मत मागितले होते आणि त्यावर धर्मशास्त्र काय सांगते याच गोष्टीची ते पडताळणी करत होते. तेवढ्यात हुजऱ्या आंत आला. त्याने बादशहाला कुर्निसात केला आणि नाशिकहून जासूद आल्याची वर्दी दिली....
मिल्खा सिंग यांचे तरुणपण
मिल्खा सिंग देशातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आणि आदरणीय धावपटू आहे, त्याने त्याच्या अतुलनीय वेगामुळे अनेक विक्रम केले आहेत. त्याच वेळी, तो खूप वेगवान असल्यामुळे त्याला "फ्लाइंग शीख" म्हणून ओळखले जाते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक मिळवणारे मिल्खा सिंग देशातील पहिले खेळाडू आहेत.
एवढेच नाही तर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही मिल्खा सिंग यांच्या विलक्षण...
झुंज : भाग २१ -
दोन दिवसांनी किल्लेदार रामशेजवर पोहोचला. आल्या बरोबर त्याने आपल्या पत्नीला छत्रपतींच्या भेटीचा वृत्तांत कथन केला. तसेच लगेचच नवीन किल्लेदाराच्या ताब्यात गड देऊन सरनौबत हंबीरराव मोहित्यांच्या मदतीला जाण्याचे छत्रपतींचे फर्मानही सांगितले. आपल्या पतीला मिळालेला हा बहुमान पाहून त्याची पत्नीचे उर अभिमानाने भरून आले. ही बातमी काही क्षणातच संपूर्ण गडावर पसरली. ज्याच्या त्याच्या तोंडी संभाजी महाराजांनी केलेल्या...
विराट कोहलीचे जिवनचरित्र मराठी मध्ये
विराट कोहली - विराट कोहली ज्यांच्याबद्दल कोणाला माहिती नाही. भारतीय क्रिकेट संघाचा महान खेळाडू कोण आहे. भारतीय क्रिकेट संघात सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीनंतर, ज्या खेळाडूने भारतीय क्रिकेट संघाला बळ दिले आणि आपला ठसा उमटवला. तो म्हणजे विराट कोहली ; ज्याने क्रिकेटमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने प्रत्येक मुलाच्या हृदयात स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे.
तो उजव्या...
मंगरूळ चवाळा: ( मनोज गावनेर )-:
तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथे प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात जगद्विख्यात नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या व संपूर्ण देशात विख्यात असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका माई मेधाताई पाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या व्यक्त होताना म्हणाल्या कि, मतीन भोसले यांच्याबद्दल त्यांनी विविध समाजमाध्यमांद्वारे वाचले आणि मतिनजी ज्यावेळी मुंबई ला...
: झुंज - भाग २०
संभाजी महाराज आपल्या तंबूत पुढच्या मोहिमेबद्दल विचार करत होते आणि तेवढ्यात हुजऱ्या आत आला. त्याने छत्रपतींना लवून मुजरा केला.
“महाराज… जासूद आलाय…” त्याने सांगितले.
“आत पाठव त्याला…” छत्रपतींनी हुकुम सोडला. जासुदाने आत येताच महाराजांना मुजरा केला.
“काय खबर?”
“महाराज… आपल्याच मानसांनं घात केला. सरदार नागोजी मानेनं फितुरी केली. त्यांच्या संग आजूक काई मराठे सरदारबी बदशाला फितूर झाले…” त्याने एका...










