Homeकृषीआमच्या जगण्याची ब्रेकिंग न्यूज

आमच्या जगण्याची ब्रेकिंग न्यूज

आम्ही टमाटे रस्त्यावर फेकून दिले,
लाल चिखल नूसता, सूतळीचा
खर्च ही निघेना
मिर्च्याचा पार ठेचा झाला, कांदे
चाळीतच सडले,अन् उस
तारखे नंतर चार महीन्यान
पाणी आटून अर्ध्या वजनातच
नूसती साखर झाल्यावर
कारखान्यात गेला. बर्याच जणांनी
धूर्यावर टाकला
तेंव्हा ही नाही यांची ब्रेकिंग न्यूज झाली

पेरणीच्या वेळी आम्हाला
बियाणे विकत घेण्याच्या
टायमाला नेमक्या ह्यांच्या
गोडाऊन मधल्या स्वयाबिनणे
उच्चांक गाठला
तव्हा नाही झाली ह्यांची ब्रेकींग न्यूज

उसनवार्या,उधार्या दूकानदाराच्या
खूशामत्या करूण
बि बियाणे खते घालूण ,वाढवल
तेच नेमकं अस्मानीण झोडपलं
आर्ध पाण्यात बूडाल, गारपिटीने झोडपल
तरीही रहायल सायल मळ्यातल
खळ्यात आल, आणि खळ्यातल
बाजारात नेल तव्हा नेमका भाव गडगडला
तव्हाही नाही झाली ह्यांची ब्रेकिंग न्यूज

अन् थोडा भाजीपाला धन धाण्याण
भाव खाला , भाड तोड आडत हमाली जाउण
दोन पैसे कास्तकाराच्या खिशात येवू लागले किच
ह्यांच्या गडगंज पगारावाल्याच्यां गृहणीच चकचकीत किचनच बजेट बिधडत
ह्यांची ब्रेकींग न्युज लाइव्ह फिरून फिरून येती टिव्हीवर.
यां मंडीतून त्या मंडीत, या घरातून त्या घरात

जेंव्हा आम्ही भोंगळ फिरायचो आज
आमचे लेकरं गणवेशात शाळला चाललेत तव्हा जो
जवारी गव्हाचा भाव होता तोच
आजही आहे.
का तर …
शंभर दिडसे कोटींना रासनात धान्य फूकटात
वाटायचय.एखाद्या चॅनल ने याची
नाही चिकीत्सा केली मजूरी
दहा विसा पट वाढली , खत बियाणे ओषधी तर
विचारूच नका आर्धी कमाई तर
दूकानदार आणि कंपण्याणीच नेली.
तिथं बर नाही ह्यांच्या चॅनेलला
पोलखोल करता आली… यांची ब्रेकींग न्युज झाली.

एखाद्या शेतकऱ्यांन कर्ज,नापीकी,
ना हमी .. कमी भाव म्हणून भर
दिवसा आत्महत्या केली तव्हा हे चॅनल वाले
सकाळचा शपथविधी, संध्याकाचा राजीनामा,
अन् यूत्या आघाड्या़ंचा मंत्रीमंडळ विस्तार
मी पून्हा याईल, पाठीतला खंजीर, ढाण्या वाघ,
तळ्यातला मूत, पावसात भिजलेले साहेब, टोलनाक्यावरचा खळखट्याक,
अभिनेत्याची आत्महत्या, अभिनेत्रीच
अफेअर दाखवण्यातच गूंग होते

धन्या विना उजाड झालेल कपाळ, अनाथ लेकरांचा टाहो, कावरी बावरी गोठ्यातली गाय
कबाड कष्ट ,आबळ परवडीतला भूतकाळ आणि विवंचनेतला वर्तमान.अंधकारमय भूतकाळ
नाही दाखवता आला हो यांना…

कोन म्हणत आमच्या बातम्या दाखवा,
नकाच करू, आमच्या फरपट
जगण्याची ब्रेकींग न्युज,

मात्र…मात्र…
भूक नावाचा राक्षस तूमच्या
पोटात उड्या मारतोना! तेव्हा
हातातला माईक खा, कॅमेरा खा किबोर्ड,माउस टिव्ही पंखे गडगंज पगारात भेटनार्या नोटा खा….
पण आमच्या घामाच्या शिंचणान पिकलेल्या मिर्च्या,टमाटे,वांगे, जवारी,गहू,तांदूळ. हात लावायचा नाही ह्याला…

अन् चालूद्या तूमची ब्रेकींग न्युज…. उपासी पोटी.

  • जगन्नाथ रावसाहेब काकडे
    मेसखेडा ता.मंठा
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular