मागील लेख मध्ये आपण पाहिले 10 वी मध्ये चांगले मार्क मिळालेले असताना त्याच विद्यार्थ्याचे मार्क्स 11 वी 12 वी मध्ये खूप कमी आलेले असतात. याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करू.
1) पहिली ते 10 मध्ये मुले शाळेत इंग्लिश विषय शिकतात , इंग्लिश मध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी पाठांतर पद्धतीवर खूप भर दिलेला असतो, यात मार्क चांगले मिळतात पण इंग्लिश चा कन्सेप्ट...
आपण सर्वजण या लिंक मराठी च्या माध्यमातून समजून घेणार आहोत शैक्षणिक क्षेत्रातिल करिअर
आपण शिक्षक नसताना सुद्धा या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.नाव कमवू शकतो चांगला पैसा मिळवू शकतोत्यासाठी पहिल्यांदा समजून घेऊ शैक्षणिक क्षेत्र काय आहेखूप पालकांचा, विद्यार्थ्यांचा समज आहे शालेय जीवनात खूप चांगले मार्क मिळवणे म्हणजे चांगले शिक्षण
यामध्ये 2 प्रकार असतात
1) Exam Oriented यालाच आपण म्हणतो परीक्षार्थीपरीक्षा डोळ्यासमोर...
संपादकीय
पु. ल देशपांडे यांच्या निधनानंतर सुनिता बाईंनी त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले होते ; त्याला जर पुलंनी उत्तर दिले असते तर …
अमित गुरव
प्रिय सुनिता,
पत्राचा मायना बघून तुझ्या नेहमीच्या शैलीत गालातल्या गालात हसलीस ना? समोर असतो तर म्हणालीही असतीस, "काय भाई, बरा आहेस ना?" पण तरीही तू मला प्रिय आहेस हे तू चांगलेच ओळखून आहेस.आपले लग्न आठवतय? 12जून 1946. दुपारी चहाच्या वेळी तुझे वडील मॅरेज रजिस्टारला घरी घेऊन आले. मी तर घरच्या लेंगा बनियन वर आणि तू पण घरातलीच साडी नेसलेली होतीस....
भारताच्या राज्यघटनेनुसार भारतीय नागरिकांनी भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्थापण्याचे घोषित केले आहे हा उद्देश साध्य करण्यासाठी राज्य घटनेने कार्यकारी मंडळ विधिमंडळ व न्यायमंडळ या संस्थात्मक सरचेनेची निर्मिती केली आहे. काळाच्या ओघामधये या संघराज्य व्यवस्थेमध्ये व त्याच्या विविध संस्थांमध्ये तसेच नागरिकांच्या सहभागातही उदासीनता आल्याचे सकृत दर्शनी दिसून येते. आज मितीस म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती नंतरच्या सहाव्या दशकातही नागरिकांचा राज्य...
जरा इकडे येते का गं ?
आपले हातातले काम बाजूला टाकून ती लगेच त्याच्या जवळ प्रकटली…..
काय झालं बोला…..
अगं हे शर्टच बटन बघ ना तुटलं आताच, जरा….
हो…देते शिवून थांबा जरा, असं म्हणून ती सुई-दोरा आणायला किचन मध्ये गेली…
तिच्या मागोमाग हा पण धावला तशी ती म्हणाली, थांबा इथेच ….
सुई-दोरा घेऊन शर्टचं बटन शिवत असताना तिने आपली नजर वर केली तर हा फक्त...
इच्छा आकांक्षा आमच्या आम्ही का बांधून घ्यायच्या,कठपूतलीसारखं का तुमच्या तालावर नाचायचं…?उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं…?
का नाही आम्ही आमची मतं मांडायची ?डोक्यावर सतत टांगती तलवार ठेवायची…!सवयच करून घेतली आता हुकून गाजवायची…!
वेळ आली आहे आता पेटून उठायची…!आम्हीही काही कमी नाही, हे दाखवून देण्याची…!स्वतःच्याच ध्येयासाठी काहीतरी करून दाखवण्याची…..!
या आपण सर्वांनी एकमेकां सावरूया…!घासातला घास इतरांनाही भरवूया…!जखडून ठेवलेली ही कठपुतलीची दोरी...
मानवाने कल्पनाही नसेल केली इतकी भयंकर महामारी येईल. अंतराळात, परग्रहावर घर बांधण्याचे स्वप्न माणूस पाहू लागला होता. चांद्रयान, मंगळयान मोहिमेने भारावून गेला होता. आलेल्या प्रत्येक संकटाला माणूस सामोरे जाऊ शकतो. प्रत्येक गोष्टीवर माणूस उपाय शोधू शकतो. निसर्गालाही आव्हान देऊ शकतो. मोठ-मोठ्या कल्पनाविश्वात माणूस रमला होता....
माझ्या घरासमोर कोणी गर्दी करू नकामाझ्या निपचित पडलेल्या देहाकडेबघून कुणी अश्रु डहाळु नका,सुरकुतलेला माझा चेहरा शांत झाला असेलआठवणींचा पागुळ आणून कोणी मला जागे करू नका,ऊर बडवून रडतील काही 'जे नव्हते माझे कधीच'सुख आणि दुःखाच्या खेळातले ते चार 'लोक' तुम्हीच,शेवटची अंघोळ घालून ,माझ्या नाकात बोळा घातला जाईल आसुसलेले प्रत्येक मन मला डोळे भरून पाहिल,आणि ; आम्ही देखील आलो होतोहे सांगण्यासाठी...
कॉलेजच्या पहिल्या दिवशीत्यानं तिला लेक्चरमध्ये बघितलंचाफेकळी नाक,गुलाबी ओठ बघूनभान त्याचं हरपलं
तिच्यासाठी तो प्रत्येक लेक्चर्सअटेंड करु लागलाकधी कॅन्टीन तर बस स्टॉपअसा तिच्यामागे तो फिरु लागला
एकतर्फी प्रेमाची चाहूलनजरेनं त्याच्या तिलाही लागलीमित्र-मैत्रिणी नावानं त्याच्याआता,तिलाही चिडवू लागली
ते माझं पाखरु चाललंयअसं तो भररस्त्यात मित्रांमध्ये ओरडलातिला राग आला,पण त्या कोवळ्या वयातहळूहळू तिचाही जीव त्याच्यात गुंतला
एके दिवशी गुलाब देवूनत्यानं तिला प्रपोज केलंहृदयात लपलेलं अल्लड प्रेमआता तिच्याही...
हॉस्टेल मध्ये माझ्या बाजूच्या रूम मध्ये दोन अंध मुली रहात होत्या. खुप मनमिळाऊ होत्या. नावं आठवत नाहीत आता. दोघी अंध त्यामुळे देहबोली साधारण सारखी च होती दोघींची. त्यामुळे दोघींमधला फरक कधी कळलाच नाही. त्यावेळी माझ्यासाठी ते तेवढं महत्वाचं नसेल कदाचित ! येता जाता नेहमी बोलायच्या माझ्याशी.
एकदा माझी तब्येत बरी नसल्याने मी कॉलेजला दांडी मारली होती. दुपारच्या जेवणासाठी मेस मध्ये...









