Home Blog Page 51
भक्ती भाव आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्री. महालक्ष्मी यात्रा संपन्न अमित गुरव -( भादवण) -: भादवण गावची श्री महालक्ष्मी यात्रा सालाबाद प्रमाणे यावर्षी ही भक्ती भावात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपन्न झाली. भाविक आणि माहेरवसियांसाठी ह्या यात्रेची प्रवणीच असते नववधूना पै पाहुण्यांची ओळख आणि लेकीना बालमैत्रिणींचा सहवास हा सुखद अनुभव गाठी ठेवत हे अस्मरणीय श्रण डोळ्यात साठवता...
अमित गुरव -: अखिल महारष्ट्र गुरव समाज संघटना यांच्याकडून समाजाचा राज्यव्यापी वधू वर मेळावा आणि सत्कार समारंभ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. ...
भादवण - : भादवण ची यात्रा कोल्हापूर जिल्हाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पण विमानाने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या घरी त्यांच्येच लांब हून आलेले पै - पाहुणे मात्र भादवण तिठ्यावरून चालत येत होते. पत्रकार अमित गुरव यांनी त्यांची वेदना लक्षात घेत त्यातीलच एका स्त्रीला गाडीवरून गावी सोडले. ...
▪️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये चक्क परराज्यातील बोगस लाभार्थींचे रॅकेट समोर आले आहे. लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवून बोगस लॉगिन आयडी तयार केले आणि त्याद्वारे चक्क ११७१ अर्ज दाखल केले. अर्ज दाखल केलेल्यांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधील रहिवासी दाखवले आहेत. ▪️प्रत्यक्षात हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील असल्याचे पोलिस, महसूल आणि महिला व बालविकास विभागाच्या...
अमित गुरव -: कोल्हापूर जिल्हयातील आजरा हा छोटासा तालुका. त्यात लोकसंख्येने मोठे असणारे आणि सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या भादवण गावचे रहिवासी विमानाने यात्रेसाठी आले. कोल्हापूर जिल्हयातील हे पहिलेच प्रवासी आहेत ज्यांनी...
रत्नागिरी - परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात २ फेब्रुवारी रोजी परीक्षेच्या दिवशी सकाळी ८ वाजलेपासून दुपारी २ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केले आहेत. परिक्षा कुठे आणि कधी होईल ? महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 ही परीक्षा रत्नागिरीतील 1. गोगटे जोगळेकर महाविद्यालय (लॉ कॉलेज),2. पटवर्धन हायस्कूल 3....
आजरा ( अमित गुरव) -: तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय असे फोन कॉल वर खोटे सांगून आजाऱ्यातील निवृत्त प्राध्यापिकेकडून ३० लाख उकळले असून या बातमीने आजरा तालुक्यात खळबळ माजली आहे. ...
आजरा - आजरा तालुक्यातील भादवण या गावी भादवण ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त शिलालेख व भारतमाता प्रतिमा पूजन लोकनियुक्त सरपंच सौ. माधुरी रणजित गाडे व ग्रापंचायत सदस्या यांच्या हस्ते झाले. यावेळी गाडे यांच्या संकल्पनेतून शालेय मुलींना ध्वजारोहणाचा मान दिला. तसेच जिल्हा क्रीडा स्पर्धेत खो - खो व वयक्तिक स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्ध्यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गौरव केला. आदर्श विद्या...
भादवण - गणपतराव आप्पाजी गोईलकर ( वय ९० ) यांचे आज वार्धक्याने निधन झाले. ते निवृत्त शिक्षक होते. उद्या दिनांक २७ जानेवारी रोजी उत्तरकार्य आहे. गोइलकर कुटुंबियांच्या दुःखात भादवण ग्रामस्थ आणि सर्व हितचिंतक सामील आहेत.
सावंतवाडी /प्रतिनिधी देशातील पहिल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांची संघटना असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महा अधिवेशन सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे भोसले नॉलेज सिटी च्या प्रांगणात ६ एप्रिल रोजी होणार असून राज्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या अधिवेशनासाठी निमंत्रित केले आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून ३...