Homeक्राईमलेकाला काळजी, दोन दिवस झाले आई फोनवर येत नाही,येऊन पाहातो तर घरामागे...

लेकाला काळजी, दोन दिवस झाले आई फोनवर येत नाही,येऊन पाहातो तर घरामागे पुरलेला मृतदेह | The boy is worried, it’s been two days since the mother does not answer the phone, she comes and sees the dead body buried behind the house |

घरामागे पुरलेला मृतदेह

लेकाला काळजी, दोन दिवस झाले आई फोनवर येत नाही,येऊन पाहातो तर घरामागे पुरलेला मृतदेह | कोल्हापुरात एक हादरवणारी घटना घडली आहे. येथे एक मुलगा जेव्हा आपल्या आईला भेटायला घरी गेला तेव्हा त्याला तिथे तिचा मृतदेह आढळून आला. जेव्हा त्याला तिच्या मारेकऱ्याची माहिती मिळाली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

घरामागे पुरलेला मृतदेह
घरामागे पुरलेला मृतदेह

कोल्हापूर: कोल्हापुरातील शाहूवाडी येथील गजापूरपैकी दिवाणबाग येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवण देत नाही म्हणून रागाच्या भरात वृध्द पतीने आपल्या वृध्द पत्नीच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी घडली असून मुलगा घरी आल्यानंतर सोमवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वृध्द पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शाहूवाडी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील गजापूरपैकी दिवाणबाग येथे दगडू सखाराम चौगुले (वय ७०) आणि पत्नी लक्ष्मी चौगुले (वय ६०) राहत होते. लक्ष्मी यांचे माहेर हेच गाव असून त्यांना दोन मुले आहेत. दोघेही मुंबईला नोकरीनिमित्त राहतात. घरी दगडू आणि लक्ष्मी दोघेच राहतात. दगडू कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पत्नी लक्ष्मी चौगुले ही जेवण देत नाही म्हणून रागाच्या भरात दगडूने लक्ष्मीच्या मानेवर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर कोयत्याने वार करून खून केला.
खून उघडकीस येऊ नये म्हणून संशयित दगडू चौगुलेने रात्रीच घरामागील परिसरात खड्डा खणून मृतदेह पुरला. तर लक्ष्मी चौगुले यांच्या शरीरावर वार करताना घराच्या भिंतींवर जमिनीवर पडलेले रक्ताचे सडे शेणाने सारवून डाग पुसून टाकले. दरम्यान, आपल्या आईशी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून फोनवर बोलणं होत नसल्याने मुलगा गणेश याला संशय आला आणि तो सोमवारी मुंबईहून घरी आला. यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
त्याने थेट शाहूवाडी पोलिसांत वडील दगडू चौगुले यांच्याविरोधात खुनाची फिर्याद दाखल केली. तसेच, लक्ष्मी यांचा पुरलेला मृतदेह दुपारी बाहेर काढून आंब्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथेच शवविच्छेदन केले आणि सायंकाळी अंत्यसंस्कार केले.तर दगडू चौगुले याच्याविरोधात ३०२ व २०१ या कलमान्वये शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास सायंकाळी अटक केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

अधिक माहिती

संदर्भ

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular