Homeवैशिष्ट्येऔंधची मूळपीठभवानी श्री यमाई देवीऔंध (ता. खटाव )

औंधची मूळपीठभवानी श्री यमाई देवीऔंध (ता. खटाव )

औंधची मूळपीठभवानी श्री यमाई देवीऔंध (ता. खटाव) येथे श्रीदेवीचे प्रख्यात स्थान ( पीठ) आहे श्रीयमाई भवानीचे .श्री यमाईचे स्थानऔंध गावाशेजारील मूळपीठ गडावर आहे . मूळपीठनिवासिनी श्री यमाई देवी हे सुखदायीनी वरदायनी देवी आहे. श्री अंबेचे सान्निध्य लाभलेले मूळपीठयमाई तीर्थ भक्त कल्याणकारी क्षेत्र आहे.  महाराष्ट्र .राज्यातील व राज्याबाहेरील विशेषतः कर्नाटक आंध्र तामिळ इ. भागातून दर्शनास येणाऱ्या लाखो भाविकांची कुलदेवता व श्रद्धास्थान असलेली ही देवता आहे .महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी यमाई देवीची मंदिरे आहेत  आणि त्यांचे  मूळपीठ   औंध येथील मूळपीठ गडावर आहे. सातारा जिल्ह्यात साताऱ्यापासून पूर्वेकडे ४२ किलोमीटर अंतरावर औंध गाव आहे . एसटी वइतर वाहनांनी औंध येता येते .रहिमतपूर हे औंध पासून 18 किलोमीटर अंतरावर असलेली रेल्वे स्टेशन आहे .
मूळपीठ गडावर श्रीयमाई देवीचे असलेले देऊळ हे एक अति प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर सुमारे १५०० वर्षापूर्वीचे चालुक्यकालीन देऊळ आहे.श्री. मूळपीठ यमाई हे आदिशक्ती पार्वती (भवानी ) चे रुप आहे , प्रख्यात शैवशक्तीपीठ आहे. 

श्री यमाई देवीच्या गाभाऱ्यात देवीची सुमारे सहा फूट उंचीची बैठी मूर्ती आहे .देवीच्या हातात त्रिशुल , डमरू  ही अस्त्रे व पान पात्रं आहे. देवीच्या डोक्यावर नागफणा आहे.गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आहे .देवीसमोर स्वयंभू तांदळा मुळपीठ आहे .शिवशक्तीच्या एकत्वाचे प्रतीक आहे .शेजारी गणपती आहे . श्रीदेवीचे समोर मंदिरा बाहेर देवीचे वाहन नंदी आहे. श्रीदेवीच्या मूळ मूर्ती पासून काही अंतरावर उत्सव वरती आहे व शेजारी शेजघर आहे .जिथे देवीचा शेज पाळणा  आहे .या खोलीत  देवीचे पूजा साहित्य वस्त्रे ,अलंकार , साड्या इ .वस्तू ठेवल्या जातात .

भारतभर शिवशक्तीची आराधना अनेक प्रकारे केली जाते .भारतीय संस्कृतीचे वर्णन या दोन शब्दांमध्ये यथार्थपणे केली जाते हे दोन शब्द म्हणजे शिव आणि शक्ती .भारतभर प्रत्येक गावामध्ये शंकराची मंदिर आहे .त्याचप्रमाणे  भगवान शिवाची प्रमुख  स्थाने असलेली बारा ज्योतिर्लिंग  विख्यात आहेत . त्याच प्रमाणे आदिशक्ती पार्वतीची अनेक पीठे देऊळे . भारतवर्षात महाराष्ट्रात गावा गावात आहेत. देवीची शक्तीपीठेही विख्यातआहेत. श्री देवीची ५१ शक्तीपीठे व भगवान शिवाचे १२ ज्योतिर्लिंगे यांच्या सांस्कृतिक धार्मिक परंपरेतून आपण सर्वजण एकसूत्रात बांधले गेलेलो आहोत . 

या शक्ती पीठातील एक  औंध येथील मूळपीठ निवासिनी श्रीयमाई हे स्वयंभू असे प्रमुख शक्तिपीठ आहे. चंडिका, दुर्गा, कालिका, महाकाली, चामुंडा अशी जगदंबेची विविध रूपे आहेत. औंधमध्येही आदिशक्ती पार्वतीभवानीची अनेक रूपे पाहावयास मिळतात.देवदेवतांनी अपप्रवृत्तीपासून रक्षण करण्यासाठी भवानी पार्वतीस 
ये माई ऽ रक्षण कर अशी हाक दिली. व ती यमाई नावाने विख्यात झाली .काही दंतकथानुसार औंध क्षेत्रीच्या मूळपीठ परिसरात औंधासुरासारख्या बलाढ्य राक्षसाचा रहिवास होता .तो देवी ध्यान व सत्कृत्य करणाऱ्या सज्जनांना त्रास देत होता .त्याने आपल्या .त्रासाने साऱ्यांना त्राही भगवान करून सोडले होते .म्हणून सर्व सज्जनशक्ती देव देवतांनी आदिमाया भगवती पार्वतीची आराधना करून औंढासुरापासून आपले रक्षण करण्याची विनंती देवीला केली . ये माई  s तू आमचं रक्षण कर अशी विनंती देवीला सर्वांनी केली .त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत देवीने औंदासुरावर आक्रमण केले . 
अगोदरच ज्योतिर्लिंग व औंदासुराची ची लढाई झाली होती .आणि या लढाईमध्ये आमदार सुराने ज्योतिर्लिंगास श्रमवले होते .थकावटीमुळे ज्योतिर्लिंग श्रीनाथ डोंगरावर विश्रांतीसाठी थांबले होते .तरनाथ डोंगराच्या पायथ्याला असलेल्या  मोरलतिर्थी अर्थात मोराळ्यात औंदासुर राक्षस युद्धसज्ज थांबला होता .या रणक्षेत्री देवीने आक्रमण केले व राक्षसाला त्यासाठी आमंत्रित केले .राक्षस ही द्वेषाने देवीवर चालून आला .घनघोर लढाई झाली .या लढाईमध्ये देवीने राक्षसाला ठार मारले . ही लढाई मोराळा या रणक्षेत्री झाली .या लढाईसाठी देवी मयूर वाहिनी होऊन आली होती .म्हणून भवानी पार्वती देवी मयूरवाहिनी ‘मोराळाई’ असे नामपावली .औंदासुराबरोबरच्या या युद्धात देवीला अनेक जखमा झाल्या होत्या. युद्धात झालेल्या जखमांचा दाह कमी करण्यासाठी  देवीने तळ्यात मोकळे केस सोडून स्नान केले .जखमा धुतल्या .भक्त जणांनी देवीस औषधी व तेल अर्पण केले .देवीच्या या ‘मुक्त केशनी स्वरूपास भक्त जण मोकळाई’ म्हणून भजतात .देवीस ओटी भरण व तेल वाहने इत्यादी उपचार पार पाडतात .
औंधासुराला ठार मारलेल्या स्थानी असलेली गावातील श्री यमाई भवानी मंदिर आहे .दंतकतीप्रमाणे युद्धात पराभूत झालेल्या औंधासुराने आपल्या मृत्यू झालेल्या ठिकाणा शेजारी देवीने राहावी अशी इच्छा व्यक्त केली होती त्याप्रमाणे देवी त्या ठिकाणी राहिलेली आहे तीच गावातील यमाई होय .
तर श्री यमाई तीर्थाच्या पूर्वेकडे श्री तुकाई हे एक स्थान आहे तू काही म्हणजे तुळजाभवानी .’ यारुपात भवानी पार्वतीने रामाची परीक्षा घेतली अशा कथा प्रसिद्ध आहेत .

‘ मूळपीठवासिनी ‘यमाई भवानीपार्वतीची’  जगन्मातेची विविध रूपे औंधमध्ये भक्तजणांस पाहावयास मिळतात.
यमाई मूळपीठ मंदिर हेप्रख्यात शिवशक्ती पीठ आहे . . आदिशक्ती पार्वती (भवानी ) चे रवाहन नंदी. त्रिशुल डमरू ही अस्त्रे, मंदिरात गणपती,स्वयंभू देवी शिवा लिंगाकार, व परिसरात शिवप्रभावळीतील देवता महादेव , मारूती ,गणपती ,महाकाली इ. आहेत.
महागौरीसम देवीस चार भुजा आहेत. वृषभ (नंदी ) तिचे वाहन आहे.  उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू  वा पात्र घेतलेला हात आहे. या बाबी गौरीरुपासम आहेत .
श्री औंध हे धार्मिक , प्राचीन ऐतिहासिक ,पौराणिक , सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा लाभलेले महत्त्वाचं गाव आहे .प्राचीन काळापासून औंध गावचे आवंध ,औंद , आऊंध , औंध असे उल्लेख पहावयास मिळतात .औंधचे श्री  यमाई  मंदिर , मूळपीठ मंदिर दीड हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आहे .हे मंदिर चालुक्य काळातील असून इसवी सन सहाव्या शतकात बांधले गेलेले आहे .गावातील मंदिर इसवी सन हजार ते अकराशे या दरम्यान विकसित झालेले आहे .औंध गावामध्ये पदमाळे , नागाळे , विशाळे , मोराळे ,दुर्गाळे .हे पाच जलाशय ( तळे ) असून त्यांचा निर्माण काळ इसवी सन 1000 च्या आसपास आहे -श्री यमाई देवीच्या गुरव पुजारी यांना विविध सनद प्राप्त आहेत 1861 मध्ये ब्रिटिश शासनाने त्यांना या विविध सनद दिलेल्या आहेत.-इसवी सन 1874 मध्ये ब्रिटिश शासनाच्या वतीने द सेक्रेटरी ऑफ स्टेट इन कॉन्सिल या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या सहीने यमाई मंदिर औंध वहिवाटदार तुकाराम बापू गुरव यास सनद प्राप्त आहेत .इसवी सन 1714 मध्ये छत्रपती शाहू महाराज सातारा यांनीही व्यवस्थेसाठी गुरव पुजारी यांना सनद दिली आहे .
सन १६५९ साली* अफजल खान व पुढे औरंगजेब  औधमध्ये आलेचा उल्लेख आहे .औंधच्या श्री यमाई मंदिरासमोरील दीपमाळ महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण आहे .तिची उंची सुमारे 69 फूट असुन ती सुमारे पाचशे वर्षांपूर्वीची जुनी आहे .औंध गावातील मोकळाई गाव मारुती मोराळाई इत्यादी जुनी मंदिरे प्राचीन व धार्मिक परंपरेचे स्मृतीचिन्ह आहे .
श्री यमाई देवी औंध दर्शन पद्धती
औंध हे गाव प्रसिद्ध शक्तीपीठ आहे . येथे श्री यमाईदेवीचे सुप्रसिद्ध असे मुळपीठ आहे . या ठिकाणी भक्तजनांची सध्या विविध दिवशी गर्दी होत असते .भाविक औंध गावात आल्यानंतर श्री यमाईतीर्थ  येथेस्नान करतात .त्यानंतर तळ्याशेजारी असलेल्या श्री मोकळाई देवीचे दर्शन करतात . तळ्यातील पाणी भक्तांना तीर्थ तुल्य आहे . या ठिकाणी स्वतः देवीने स्नान केल्यामुळे त्या पाण्यामुळे भक्तांचे त्वचारोग खरूज नायटा इत्यादी बरे होतात अशी लोक श्रद्धा आहे. भक्तजन मोकळाई देवीचे दर्शन घेऊन .देवीची ओटी भरतात व देवीला तेलही अर्पण करतात .तळ्यावर उभे राहून उत्तरेकडील श्री ज्योतिबा व मोराळाई देवीला वंदन करतात .त्यानंतर तिथून जवळ असलेल्या गावातील यमाई भवानीचे दर्शन घ्यावयास लोक जातात .यमाई समोरील नंदी व मंदिरा अगोदरचा गणपती यांचे दर्शन घेऊन लोक मंदिरात जातात .देवीचे दर्शनाचे उपचार फुलाच्या पुलाचार आदी पार पडले जातात .: मंदिरात  जातात व दर्शनाचे उपचार व आपापल्या कुलाचे कुलाचार पार पाडले जातात.यानंतर भक्तजन श्री मुळपीठ  डोंगरावरीलश्री यमाईच्या दर्शनासाठी जातात डोंगरावर जाण्यासाठी चालत पायऱ्यांचा मार्ग आहे .सुमारे 440 पायऱ्या चढून वर जावे लागते .दुसरा रस्त्याचा मार्ग आहे . त्यावरुन देवळाकडे वाहनाने जाता येते .मंदिराच्या परिसरात पोहोचल्यावर किल्लावजा तटबंदी दिसते .तटबंदीत असलेल्या भव्य दरवाजातून आत गेल्यानंतर समोरच देवीचे प्राचीन मंदिर दिसते .हे मंदिर चालुक्य काळातील दीड हजार वर्षांपूर्वीचे मंदिर आहे .प्रांगणात शिवदत्त मंदिर , घाटजाई ,महाकाली , नंदी  इत्यादी दर्शन घेऊन भाविक मुख्य मंदिरात जातात .मंदिरात जाताना उजव्या बाजूला देवीची उत्सव मूर्ती आहे तर गाभाऱ्यामध्ये श्री यमाई देवीची भव्य अशी बैठी मूर्ती आहे .भक्त लोक देवीचे दर्शन घेतात व देवीचे पूजा उपचार व कुलाचार पार पाडतात.*

श्री यमाई देवीची यात्रा पौष महिन्यात असते पाऊस शुद्ध १२ पासून पुढे पंधरा दिवस ती भरते . पौष पौर्णिमेस श्री यमाई देवीचा छबिना अर्थात पालखी सोहळा  व दीपोत्सवअसतो .तर त्याच्या दुसऱ्या दिवशी रथोत्सव असतो. श्रींची यात्रा ही भक्तजनांसाठी , औंधकरांसाठी व परिसरातील लोकांसाठी एक  पर्वणीच असते .

अश्विन शुद्ध एक ते दसरा असा दहा दिवसाचा नवरात्र उत्सव श्री यमाई मंदिरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .गावातील श्री यमाई देवीची वेगवेगळ्या रूपातील पूजा ही भक्तजनांसाठी आकर्षणाचा मुद्दा असते .भल्या पहाटे श्री मूळपीठावर दर्शनासाठी औंध व  दूर गावातील -परिसरातील भक्त जणांची रीघ असते .या उत्सवासह  चैत्री उत्सवाचे पाच दिवस , माही पौर्णिमेचा छबिना हेही परंपरेचे महत्त्वाचे दिवस आहेत .
एकूणच औंध गाव हे धार्मिक ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे एक मोठे स्मृतीचिन्ह होऊन राहिले आहे .

श्री राजेंद्र बाळकृष्ण गुरव
यमाई भवानी देवी पुजारी औंध

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular