Homeघडामोडीश्री.विठ्ठल सेवा संस्थेच्या चेअरमनपदी मोरे यांची निवड.

श्री.विठ्ठल सेवा संस्थेच्या चेअरमनपदी मोरे यांची निवड.

उंड्री:ता.पन्हाळा येथील श्री.विठ्ठल विकास सेवा संस्थेच्या आज शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत विजय बळीराम मोरे यांची चेअरमनपदी तर सौ.उज्वला शरद कुदळे यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री.एच.बी.खोत व सचिव सरदार पाटील होते.यावेळी सभेत नूतन चेअरमन,व्हा.चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कार प्रसंगी श्री.विठ्ठल विकास सोसायटी काही मूठभर लोकांच्या कारभारामुळे आर्थिक संकटात सापडली आहे पण येत्या काळात त्यांच्यावर वसुलीसाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल.
व एक गांव एक सोसायटी आसणारी हि संस्था सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न माझा आसेल.यासाठी संचालक मंडळ, प्रशासन, बँक निरिक्षक यांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे..असे प्रतिपादन नूतन चेअरमन विजय मोरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

चेअरमन पदासाठी विजय मोरे यांचे नांव बापू यादव यांनी सुचविले तर त्याला लालासो पाटील यांनी अनुमोदन दिले.
व्हा.चेअरमन पदासाठी सौ.उज्वला कुदळे यांचे नांव युवराज सुतार यांनी सुचविले तर त्यांना एकनाथ यादव यांनी अनुमोदन दिले.
चेअरमन,व्हा.चेअरमन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झालेने निवड बिनविरोध झालेचे जाहीर करण्यात आले.

स्वागत यशवंत गवळी यांनी केले व आभार बापू धोंडी नाकार्डे यांनी मानले.

निवडीवेळी गटनेते मा.नंदकुमार नाकार्डे,अतुल कुदळे,दगडू यादव, यांचेसह तंटामुक्त अध्यक्ष संदिप यादव,मा.डे.सरपंच शरद मोरे,रंगराव कांबळे,शिवाजी यादव(आप्पा),अमोल यादव (दुकानदार),कृष्णात नाकार्डे,राजू गवळी,भगवान यादव,सुनील कुदळे,अमर यादव,ज्ञानेश्वर सुतार,वैभव मोरे,किरण यादव,रोहित पाटील, राजू पाटील,दिपक यादव (1572),अमोल यादव (टोनी),विनोद यादव,सूरज कुदळे,संस्थेचे सभासद ,कर्मचारी,ग्रामस्थ,पत्रकार उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular