Homeघडामोडीपेन्शन संदर्भात सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे-आप्पा कुलकर्णी

पेन्शन संदर्भात सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे-आप्पा कुलकर्णी

आजरा (हसन तकीलदार):-राज्यातील ऐशीं लाख कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढीचा लाभ देणार असल्याचे आश्वासन सरकारने दिलेत असे व्हाट्सअप गृप मार्फत पसरवत शासन जनतेची दिशाभूल करीत असलेचे मत आजरा येथील गिरणीकामगार कार्यालयामध्ये घेतलेल्या सभेत बोलताना आप्पा कुलकर्णी (पेन्शन संघटना जिल्हा सचिव)व्यक्त केले. अध्यक्षस्थानी कॉ. शांताराम पाटील होते.


आप्पा कुलकर्णी यांनी पुढे बोलताना म्हणाले की, शासनाने ए.पी.एस प्रमाणे पेन्शन द्यावी यासाठी सातत्याने लढा सुरु असून आकरा नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई व नऊ डिसेंबर 2025रोजी दिल्ली येथे होणाऱ्या मोर्च्यात सामिल होण्याचे आवाहन केले.

काँ. धोडिंबा कुंभार यानी लढल्या शिवाय काहीच मिळत नाही. मुबंईत मोफत घरे घेतल्या शिवाय चळवळ थांबवायची नाही. संघटनेत विचारा बरोबर डोकी किती आहेत याला जास्त महत्व असलेचे सांगितलं. शांताराम पाटील यानी सेलो वांगणीची घरे लागल्याचे सांगून गिरणी कामगारांची दिशाभूल केली जात असून मुंबईत घर आणी नऊ हजार पेन्शन मिळालीच पाहिजे असे मत व्यक्त केले.

यावेळी नारायण राणे, निवृती मिसाळ, रघुनाथ कातकर,विठ्ठल बामणे, मनाप्पा बोलके, अनिता बागवे, विद्या मस्कर, केरूबाई शिंदे, सुरेखा बागवे याच्यासह गिरणीकामगार वारसदार उपस्थित होते.आभार कॉ.संजय घाटगे यांनी मानले.

“ग्लॅमर नाही, सत्य पाहिजे!”
जर तुम्हाला अभिनेत्रींच्या पोज नाही तर बातमीमागचं सत्य हवं असेल —
तर फक्त एक काम करा 👉 Link Marathi चॅनेल Follow, Subscribe आणि Share करा!
🎯 सत्याशी जोडलेले राहा, कारण आम्ही बातमी नाही — दिशा दाखवतो!

https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular