‘ सायकल ’ हे नाव ऐकलं की प्रत्येकाला प्रत्येकाचं बालपण आठवतं.. आत्ता देखील खुप जण सायकलच्या संपर्कामध्ये आहेत; परंतु आत्तापेक्षा जास्त लहानपणी माणूस सायकल वापरत होता. लहान मुलं नीट रांगायला,चालायला शिकले की (गाडी) सायकलचा हट्ट धरते, मग ती सायकल लहान असो किंवा मोठी.. तेव्हापासून सायकल बद्दलची ओढ मनात लागून राहते ती कायमचीच…असंख्य वेळा सायकल वरून पडलो तरी सुद्धा सायकल चालविणे सोडविशी वाटत नाही एवढे घट्ट नाते सायकल जवळ असायचे..
सध्याच्या युगामध्ये कोणी सायकल मागितली तर तो एक हट्ट म्हणून पुरवला जातो परंतु; तो एक काळ असा होता की, पूर्वी दळण-वळणासासाठी सायकल हे एकमेव साधन उपलब्ध असायचे,पायी जाण्याशिवाय पर्याय नसायचा. दिसायला खूप लहान असली तरी, मोठ-मोठी कचेरीतील काम, अत्यावश्यक काम तिच्यामार्फत शक्य व्हायची..पूर्वी मोबाईल, टेलीफोन नव्हते त्यावेळी , तार पाठवणे ही सुविधा असायची, तार घरोघरी पोहचवणारा व्यक्ती देखील सायकल घेऊनच येई.. कालांतराने सुरू झालेल्या डिजिटल सुविधेमुळे हे दृश्य आता कुठेही पाहायला मिळत नाही.. असे देखील असले तरी आजसुद्धा देशामध्ये , राज्यांमध्ये ऑलिम्पिक सायकल स्पर्धा चालू आहेत.. सायकलचे महत्व तसेच दर्जा अजूनही टिकून आहे.. सध्याच्या आधुनिक युगात पाहायला गेलो तर रस्त्यावर प्रचंड वाहनांची गर्दी , ये-जा सुरू असते..त्यामध्ये विशेष करून चार चाकी वाहने व दुचाकी (मोटार) सर्वाधिक प्रमाणात दिसून येतात परंतु; त्यांमध्ये सायकल कुठेही नसते, क्वचितच पाहायला मिळते..दिवसेंदिवस होणाऱ्या डिजिटल, यांत्रिक क्षेत्रांमध्ये प्रगती नक्कीच दिसून येते, एका पेक्षा एक मॉडेल असणाऱ्या वाहनांची निर्मिती केली जाते..देशामध्ये १३५ कोटी लोकसंख्येमध्ये निम्म्या लोकांकडे वाहने आहेत.. विकास व्हावा , वाहनांचा वापरही व्हावा पण, तेवढाच पर्यावरणाचे समतोल राखणे गरजेचे आहे.. वायू प्रदूषणामुळे पर्यावरणावर खूप मोठा परिणाम होतोय हे सर्वच जाणतात..सायकलच्या वापरामुळे शारीरिक व्यायाम देखील होतो तसेच वायू प्रदूषण रोखण्यास मदतही होते. सायकल हे एक साधनचं नाही तर सगळ्यांच्या मनात घर करून गेलेला दुवा आहे , कारण त्याला कोणतंही इंधन कामी येत नाही..कामी येतं ते फक्त कष्ट व मेहनत…!
वातावरण असेल स्वच्छ ,
पर्यावरणाचे होई रक्षण!
- विशाखा चंद्रकांत आगरे..
दापोली, पांगारी
मुख्यसंपादक