Homeमुक्त- व्यासपीठआपण हे केलच पाहिजे ..

आपण हे केलच पाहिजे ..

विषयानुसार कळाले नसेल की नेमकं काय बोलायच आहे . म्हणून च शीर्षक असे काही तरी ठेवलं की तुम्ही आवर्जून वाचल पाहिजे.  आपण सर्व पालक आहोत , काही भविष्यात होतील त्या सर्वांसाठी च खूप मोलाचे शब्द मांडण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे.

 आपली आपत्य कोणत्या परिस्थिती तून प्रवास करत आहेत ,  कसे घडत आहेत याची जाणीव असणे , देखरेख असणे , अत्यंत गरजेचं आहे. 

हल्ली आपल्या मुलांकडे पाहिलं तर समजत की ते खूपच एक्सट्रा क्रिएटिव्हिटी ने भरकच्च आहेत. आपल्याला त्या काळात फारश्या सुविधा नव्हत्या जितक्या आता  आहेत त्यातून आपण शालेय जीवन पूर्ण करत इथवर आलो आहोत. आजी आजोबा यांचे संस्कार , एकत्र कुटुंब पद्धती यांची बांधणी आपल्या संस्कारात दिसून येते. पण सध्या तर विभक्त कुटुंब पद्धती फारश्या आढळून येतात , आपल्या आपत्यावर योग्य संस्कार होणे खूप गरजेचे आहे.

पहाटे लवकर उठणे, व्यायाम करणे , योगा करणे , किमान अर्धा ते एक तास ,  बाकीच्या विधी आवरून देव्हाऱ्यासमोर प्रार्थना करणे , हे जीवन आपल्याला दिल्या बद्दल धन्यवाद करणे , प्रत्येक दिवसाचा आढावा घेणे , तिथून शाळा , खाजगी क्लास वगैरे तर यात आलेच , शिवाय महत्वाचं आहे आपल्या मुलाला कोणत्या गोष्टीत रुची आहे , ओढ आहे , छंद आहे. तो जोपासणे, त्यात मुलाचे प्रोत्साहन वाढवणे. त्यांच्या भाषा शैली चांगली ठेवण्यात आपण लक्ष दिले पाहिजे. बहुतेकदा  आपण च घरात वाद होताना अपशब्द उच्चारतो त्याचा परिणाम मुलावर लगेच होतो. यावर स्वतः ही लक्ष देणे गरजेचे आहे . आपण जसे वागू तसे मुलांना आत्मसात करण्यास वेळ लागत नाहीत.

टीव्ही पाहतांना आपली मुले काहीतरी नवीन गोष्टी शिकतील आत्मसात करू शकतील असे पाहण्यास द्या . ज्या चित्रपटातून प्रेरणा मिळेल , काही नवीन कल्पना शिकण्यास मिळतील.

आजकाल मोबाईल शिवाय मुले दिसत च नाही गेम, यु ट्यूब वरचे विडिओ  पाहण्यातच दंग असतात . हे खूप मोठं व्यसन आहे हे कमी झालं पाहिजे. मुळात ते काय पाहत आहे हे ही महत्वाचं आहे. कारण बाल वयापासून त्यांना कोणत्या गोष्टी शिकण्यास मिळतात , पाहण्यास मिळतात यावर त्यांचे भविष्य असते , विचारसरणी असते.

आपल्या पाल्याच्या ताटात सर्व प्रकारचे कडधान्य , भाजीपाला देत राहा , मुलांची खूप नाटक असतात भाज्या आवडत नाहीत पण लहानपणी च ती सवय करा याने पुढे त्रास होणार नाही.  अन्न ग्रहण करताना एखादा श्लोक म्हणण्याची सवय राहू द्या . शाळेत जाताना आई वडील आजी आजोबा याना नमस्कार करून जाण्याची सवय आत्मसात होऊ द्या.

थोर व्यक्तींनी ग्रंथ , भावार्थ दीपिका , गीता  यांचे शब्द  फक्त कागदात च बंद राहण्यास नाही लिहिले गेलेत.

रोज सांयकाळी किमान १५ मिनिटे ज्ञानेश्वरी , तुकारामाच्या गाथा , श्लोक यांचं त्यांच्याकडून वाचन करून घेतले पाहिजे. प्रत्येक मुलाला  छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती झाला पाहिजे . पोवाडा , शिव गर्जना  पाठ असायला हव्यात. या सर्व गोष्टी लहान पणापासून हळू हळू आत्मसात करून घेतल्या पाहिजेत. देशातल्या वीर जवानांनी , हुतात्म्यांनी आपल्या साठी आपल्या देशासाठी काय कर्तव्य बजावली या सर्व गोष्टी ज्ञात असले पाहिजे . अभ्यासाला इतिहास विषय आहे आणि प्रश्नांची उत्तरे देणे इतक्या पुरताच इतिहास मर्यादित नसू नये. पुन्हा नवीन इतिहास घडावा इतकं तरी त्यातुन शिकता आले पाहिजे . नाहीतर मुलांना फारसे तर चित्रपटातील गाणी , हिरो हिरोइन्स त्यांचे च संपूर्ण माहिती पाठ असते. प्रत्येक घरातून मुलांनी मैदानी खेळ खेळले गेले पाहिजे तरच ऑलम्पिक मध्ये भारत पुढे जाईल , याने च आवड निर्माण होईल .

सध्या च माझ्या आजोळी गेले असताना गावातील मुलांना यात्रेचे प्रक्षिक्षण घेत असणारे विडिओ स्टेटस ला ठेवले होते . बऱ्याच जणांच्या वयक्तिक मत खूप छान आली होती. मुलांना खरच आपली परंपरा माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही कितीही शहरात राहा आपल्या गावी काय काय  घडत , कोणत्या रीतीने संस्कार जपले जाते या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहेत . फक्त शालेय पुस्तकी किडा होणं हे ज्ञान नाहीय . प्रॅक्टिकल गोष्टी करू देणे हे महत्वाचं आहे.

कीर्तन भजन असताना टाळ मृदंगासोबत मुले भक्तिमय झाली पाहिजे त . आपली संस्कृती , वारी , मुलांना समजली पाहिजे. शेती काय आहे शेतीतून काय काय उत्पादन केले जाते , कोणती कोणती पिकं घेतली जातात . त्यासाठी शेतकरी काय कष्ट घेतो या सर्व गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.

 आपण खाणारे खाद्य आपल्या ताटात कोणत्या कोणत्या क्रिया करून पोहोच होते या गोष्टी माहित असणे गरजेचे आहे . लहान
पणा पासूनच जेवताना आवश्यक असेल तितकेच अन्न घेऊन संपवले पाहिजे, घरात मोठे व्यक्ती आल्या त्यांना नमस्कार करणे , पाणी आणून देणे , त्यांच्या सोबत वेळ घालवणे हे घडले पाहिजे नाहीतर सध्या घरी कोणी हि येवो आई वडील पाहतील असा विचार करून स्वतः  मोबाइल मध्ये डोके खुपसून बसलेले असतात  यामुळे आपली नाती वृद्धिंगत होत नाहीत . संभाषण वाढत नाहीत , नात्यातील गोडवा वाढत नाही.

त्यासोबत मुलांना लाड, प्रेम देणं गरजेचं आहे च पण नेहमीच ते सांगतील ते मागतील त्या गोष्टी पुरवणे चुकीचं आहे , आपल्याला नेहमी वाट त आपल्याला ज्या गोष्टी भेटल्या नाहीत त्या आपल्या मुलाला द्याव्या , द्या त्यासाठी दुमत नक्कीच नाही पण गरजेपेक्षा जास्त नाही . ज्या वस्तूंची गरज मुलांना फारशी नाही ती नका घेऊ, जी खरच उपयोगी पडेल ती घ्या , पिझ्झा बर्गर  कधी तरी द्या , पुन्हा मागणी केली तर थालीपीठ करून द्या , पारंपरिक पद्धतीने आपण आपल्या आजी कडून शिकलेल्या डिश करून द्या , नेहमीच बाहेरच्या खाण्याची सवय लावू नका . कपड्यांसाठी अनावश्यक पैसे खर्च करू नका . जितके गरजेचे आहे तितके च खरेदी करा, मुलांना ही आपले आई वडील कोणत्या पद्धतीने काबाड कष्ट करत आयुष्य  जगत असतात हे समजलं पाहिजे, त्यांनी मागणी केल्यावर सर्वच गोष्टी पुरविणे हे भविष्यात अति लाडाचे परिणाम आपल्या च सहन करावे लागतात हे नका विसरू. आपल्याला त्या काळात एक प्यारेगॉन भेटायचा त्यात् च २ -३ वर्ष निघून जायची . आता चा काळ बदलला मैदानात जाताना , शाळेत जाताना , फिरायला जातांना असे वेगवेगळे चप्पल जोड पाहायला मिळतात .

 मुलगी असो किंव्हा मुलगा यांना  वेळे नुसार घरची काम शिकवली गेली पाहिजे. 

 कधी कधी वेळ मिळेल तेंव्हा मुलांना पाककृती ही शिकवली गेली पाहिजे अचानक आपल्या आयुष्यात काही संकट ओढवली तर कुणाकडे पाहत बसणार त्यावेळी आपली च मुलं काही ना काही करून देतील त्याचा किती मोठा आधार असेल तुम्हीच विचार करा . अभ्यास , प्रेम , शिकवण , भक्ती , कलाकृती , पाककृती , खेळ , आदर -सम्मान , मैत्री या सर्व गोष्टी त आपली मुले पुढे गेली पाहिजे. काय वाटत तुम्हाला याबद्दल तुम्ही ही मला कळवा त्या सोबत अजून काही सजेशन द्यावयाचे असल्यास तसेही कळवा मी पुढच्या लेखात ते मांडण्याचा प्रयत्न नक्की करेन .

आपल्या मुलांचे बर्थ डे पार्टी आपल्या ला सोईस्कर जातील अश्या च साजऱ्या करा . प्रमाणापेक्षा जास्त खर्च करण्यास गेलात तर मुलांना त्याच सवयी लागून जातील . बर्थ डे साठी काही तरी नवीन उपक्रम राबवा. त्यातून त्यानां काहीतरी शिकण्यास मिळेल . वीकेण्ड ला अश्या ठिकाणी फिरायला जा ज्याठिकाणी निसर्गाची पुरेपूर माहिती मिळेल. निसर्गाशी त्यांच नातं घट्ट होईल. ओढ वाढेल. आवड निर्माण होईल. देवस्थान दाखवा, राजांचे किल्ले दाखवा , त्यांची माहिती द्या .

 लाठीकाठी, कराटे, लेझिम, ढोल ताशे, टाळ, मृदंग वाजवण्याची कला , पारंपरिक पद्धती,
मुलामध्ये अवगत असली पाहिजे. ग्रंथालय गाठून पुस्तकं वाचण्याची इच्छा निर्माण केली पाहिजे हल्ली पुस्तकं वाचन वर्ग फारच कमी झाला आहे. पुस्तकं पाल्याला घडवत असतात, वेळेचे नियोजन शिकवता आले पाहिजे. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला महत्व दिलं पाहिजे. थोरा मोठ्यांचा आदर करता आला पाहिजे. मुक्या जनावरांना जीव लावता आला पाहिजे.

रात्रींचे झोपताना देवाचे मुखात नाव किंव्हा एखादा श्लोक असुद्या . थोर व्यक्तीच्या गोष्टी सांगून त्यांना झोपी जाऊ द्या . असे केल्याने त्यांना आयुष्यात काहीतरी चांगले विचार येत राहतील.

 बदल खूप महत्वाचा आहे. एकमेकातील संवाद संपत चालला आहे.

आपण च पुढची पिढी घडवत असतो . आपणच या गोष्टी चा पाठपुरावा करत राहिलो तर नक्कीच बदल घडत राहतील . आता मी इतकं सर्व सांगितलं आहे यासाठी मी ही तितकीच प्रयत्नशील आहे , मी ही काही यात पारंगत आहे अश्यातला भाग नाही , माझ्या मुलीला या गोष्टी शिकवण्या साठी मी हि बऱ्याच गोष्टी आत्मसात करत आहे , किमान ५ व्या वर्षातच छत्रपती  शिवाजी महाराजांचा पोवाडा तिने आत्मसात केला यात माझा आनंद गगनात होता. बाकी गोष्टी शिकवण्यास मला ही खूप कसरत घ्यावी लागते .  आपली मुले आपल्या देशाचे भविष्य आहेत . शतक कितीही बदलत असले तरी नात्यातील प्रेम , आदर कमी होत चालला आहे .

त्याला आताच सावरलं गेलं पाहिजे,  हे आपण केलंच पाहिजे.

आयुष्य जगण्याची कला शिकवली पाहिजे . आयुष्यातले धडे त्यांना जगता आले पाहिजे . पुस्तकांची परीक्षा इयतेपर्यंत च मर्यादित असते पण आयुष्याच्या  परीक्षेत कसे यशस्वी झाले पाहिजे याचे कोडे त्यांना सोडवता  आले पाहिजे.

 धन्यवाद … !

रुपाली शिंदे

(भादवन – आजरा ) 

Previous article
Next article
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular