आयुष्य

प्रत्येकवेळी ओठांनी काहीतरी बोलावं व्यक्त व्हावं अस काही नाही.
कधी कधी निःशब्द असताना खूप काही बोलल पाहिजे.
” खरंतर निशब्द असताना खूप काही बोलून जाणे ही कला असते.
आणि ही कला तोच आत्मसात करू शकतो ज्याला अंतर्मनाचे ज्ञान असेल. ” जेव्हा दोन व्यक्ती एकरूप होतात खरंतर तेव्हा त्या दोघांतला मूक संवाद सुरू होतो.
हा संवाद चेहऱ्यावरचे भाव टिपायला शिकवतो.
” एकाच्या डोळ्यातील पाणी बघून दुसऱ्याला कळायला हवं की काळजात काय जखम झाली किंवा काय दडलंय.
चेऱ्यावरचे सुखद दुःखद भाव ओळखता यायला हवेत.
” काही माणसे अशी सुद्धा असतात ” जी कधी खोटी जरी बोलायला लागली तरी,
त्याचा आवाज आतून येत नाही किंवा तो दबल्या जातो समोरची व्यक्ती चटकन ओळखू शकते त्याच्या बोलण्यातील खोटेपण कारण “खोटे बोलणे तिथं जमत नाही कारण ती माणसे साधी असतात.
काही माणसे अशी असतात ज्यांच्या चेहऱ्यावर अगदी साधी सुद्धा रागाची छटा आली तर,
पटकन लक्षात येत बोलका असतो त्यांचा चेहरा आणि न बोलता ओळखता येणारा भाव असतो दुसऱ्याकडे.
” हा संवाद””——
बऱ्याचदा निशब्द राहून खूप काही मिळवता येता माणसाच्या या धावपळीच्या जगात सभोवताली वावरताना खरंतर कधी कधी मौन पाळणं खूप गरजेचं आणि महत्वाचं असत.
” निशब्द असणे म्हणजे शब्द नसणे असा त्याचा अर्थ नाही.
उलट वरून शांत दिसणारा राजहंस ज्याप्रमाणे पाण्यावर पोहण्यासाठी धडपडत असतो अगदी तसच,
आपल्या मनातल्या प्रलयाला शांत केले की किंवा विद्रोह जरी असला तरी चेहऱ्याच्या अचूक किनाऱ्यावरती तो दिसायला हवा ती खरी निशब्दता……!
” आयुष्य खूप सुंदर आहे फुलणारे फुले, उडणारे फुलपाखरे,रंगणारा इंद्रधनू,पडणारा पाऊस, वाहणारा झरा.
हा निसर्ग निशब्द असतो पण किती बोलका वाटतो.
“पडणारा एक थेंब जरी अंगावर पडला तरी शरीरात जो रोमांच शहारा उठतो जी धून छेडल्या जाते ही खरी निशब्दता पण संगीताने दाटून आलेली.
” मातीचा गंध जेव्हा पसरू लागतो आणि मनातल्या मनात गाणं वाजू लागत,
ही खरी निशब्दता.
—- प्रत्येक वेळी निशब्दता शब्दाविन असते अस नाही खरंतर ती शब्दाने गुंफलेली मधुर विणेप्रमाणे नाद (आवाज) निर्माण करत असते….
ही निशब्दता आयुष्यात भरता आली तर एकच….
” वाह क्या बात आयुष्य फार सुंदर आहे हो…..

  • प्रविणकुमार वानखेडे
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular