जयदेवी जयदेवी जय पुतळा काकू
तुमचा नातू खातो गायछाप तंबाकू
मोठा झाल्यावर होईल डाकू
म्हणून म्हणलं मी सांगून टाकू
जयदेवी जयदेवी…।।१।।
गुटखा खाऊनी बदनाम झाला
इंग्लिश ऐवजी देशीची प्याला
लाडाचा लाडोबा अंगावर आला
आता तरी त्याला आवर घाला
जयदेवी जयदेवी…।।२।।
ठेल्याभोवती नित्त्य फिरतो
संधी मिळता सिगरेट चोरतो
स्टाईल मारूनी धूर काढतो
असा कसा हो तुमचा पोर तो
जयदेवी जयदेवी…।।३।।
दरवळ सुटते तो रेल्वेत येता
लाल पिवळा रंग चढलाय दाता
बाजू लोक देती त्याला पहाता
टी सी ने थोबडला त्याला थुंकता
जयदेवी जयदेवी…।।४।।
✍️ श्री.विजय शिंदे..
३२शिराळा,सांगली.
मुख्यसंपादक