Homeमुक्त- व्यासपीठकाळजात आग लागली की कवी होतो… आणि वेदननं पोळला की कवी घडतो….

काळजात आग लागली की कवी होतो… आणि वेदननं पोळला की कवी घडतो….

पोटाला लागणारी आग ,
किमान पाण्याने तरी विझते…
पण काळजातली आग ,
कशाने हो विझते…

दैवाचे भोग जेव्हा पाश आवळते ,
तेव्हा काळजातला आक्रोश ,
ती दगडावर करते…
दगदाचाच देव तो ,
त्याला पाझर कधी हो फुटते…

घरचा दिवा विझतो तेव्हा,
घरभर अंधाराचे साम्राज्य पसरते…
शेरभर तेल उधार द्यायला,
वाण्याचेही कवाड बंद हॊते….

पोरं उपाशी हाय म्हणून माय हंबरते…
ते बघून गोठ्यातल्या ,
खाटीक गायला ही पान्हा फुटते…
दोन घास लेकरांना घाल वो माय ,
म्हणतं नाही माणूस तेव्हा माणुसकी संपते ….

लेकरांच्या भुकेनं मायचाही बांध फुटतो , आणि
दगडाच्या देवाला ती अश्रुंचा अभिषेक घालते….
शेवटी दगडाचाच देव ना तो ,
त्याला पाझर कधी हो फुटते…..

एक शेर अर्ज किया ,
काळजात आग लागली की कवी होतो…
आणि वेदननं पोळला की कवी घडतो….

  • सुनीता खेनगले

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular